''अफगाणिस्तानी आर्मीच्या मदतीला आलात तर...'' - तालिबानची भारताला धमकी!

''भारताने अफगाणिस्तानच्या सैन्याला मदत केली तर ते भारतासाठी चांगलं होणार नाही'' अशी धमकी तालिबानच्या प्रवक्त्याने भारताला दिली आहे.
''अफगाणिस्तानी आर्मीच्या मदतीला आलात तर...'' - तालिबानची भारताला धमकी!
''अफगाणिस्तानी आर्मीच्या मदतीला आलात तर...'' - तालिबानची भारताला धमकी!Saam Tv News
Published On

अफगाणिस्तान सरकारचे लष्कर (Afgan Army) आणि बंडखोर तालिबान (Taliban) यांच्यात जोरदार संघर्ष सुरु आहे. यात तालिबान अफगाणिस्तानच्या लष्करावर भारी पडत असून तालिबान हा अफगाणिस्तानची राजधानी काबुलपासून (kabul) अवघ्या १३० किलोमीटर अंतरावर असल्याचं बोललं जातयं. अशातच तालिबानने भारतालाही धमकी दिली आहे. ''भारताने अफगाणिस्तानच्या सैन्याला मदत केली तर ते भारतासाठी चांगलं होणार नाही'' अशी धमकी तालिबानच्या प्रवक्त्याने भारताला दिली आहे. (Taliban threaten India; If India helps the Afghan army, it will not be good for India)

हे देखील पहा -

तालिबानच्या कतार देशातल्या दोहा येथील कार्यालयातील अधिकृत प्रवक्ता मोहम्मद सोहिल साहीन (Muhammed Suhail Shaheen - Taliban's spokesperson) याने एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेशी चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान त्याने भारताला हा धमकीवजा इशारा दिला आहे. “जर ते (भारतीय सैन्य) अफगाणिस्तान लष्कराच्या मदतीला आले किंवा त्यांनी इथे आपली उपस्थिती दाखवली तर त्यांच्यासाठी (भारतासाठी) हे चांगलं ठरणार नाही. त्यांनी अफगाणिस्तानमध्ये इतर देशांनी सैन्य पाठवलं, तेव्हा काय घडलं हे पाहिलं आहे. हे सर्व प्रकरण त्यांच्यासाठी एखाद्या खुल्या पुस्तकाइतकं स्पष्ट आहे,” असं साहीन म्हणाला आहे.

''अफगाणिस्तानी आर्मीच्या मदतीला आलात तर...'' - तालिबानची भारताला धमकी!
Twitterकडून राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट अनलॉक

शुक्रवारी तालिबानने दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहार, हेल्मंडसह आणखी चार शहरं ताब्यात घेतली. तालिबानी सैन्य राजधानी काबूलकडे कूच करीत असून काही दिवसांमध्ये तालिबान अफगाणिस्तानची राजधानी असलेलं शहर काबूलही ताब्यात घेईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानातील मोठ्या शहरांसह ३४ प्रांतांपैकी १८ प्रांतांच्या राजधान्या या तालिबानी बंडखोरांच्या ताब्यात गेल्या आहेत. आता अफगाणिस्तानच्या दोन तृतीयांश भागावर त्यांचे नियंत्रण आहे. तालिबान्यांनी राजधानी काबूललाही वेढा दिला असून तेथे जोरदार संघर्ष सुरू आहे. तालिबानचा वाढता प्रभाव ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com