Taliban : परत हादरला! पंजशीरमधील ५ तळांवर अज्ञात विमानांचा एअरस्ट्राईक

तालिबानच्या मदतीकरिता पाकिस्तानने पंजशीरमध्ये लढाऊ हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे बॉम्बफेक करत पंजशीरवरती ताबा घेण्यास सुरवात केली होती.
Taliban : परत हादरला! पंजशीरमधील ५ तळांवर अज्ञात विमानांचा एअरस्ट्राईक
Taliban : परत हादरला! पंजशीरमधील ५ तळांवर अज्ञात विमानांचा एअरस्ट्राईकSaam Tv

वृत्तसंस्था : तालिबानच्या Taliban मदतीकरिता पाकिस्तानने पंजशीरमध्ये Panjshir लढाऊ हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे बॉम्बफेक करत पंजशीरवरती ताबा घेण्यास सुरवात केली होती. यामुळे मध्यरात्री अज्ञात लढाऊ विमानांनी पंजशीरमध्ये तालिबानच्या तळांवर हल्ला केला आहे. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणेही स्पष्टीकरण आले नाही.

स्थानिक मीडियानुसार मिळालेल्या माहितीनुसार हवाई हल्ले झाले आहेत. रविवारी रात्री पाकिस्तानच्या हवाई दलाने लढाऊ विमाने आणि ड्रोनच्या साह्याने अफगाणिस्तान मधील कार्यकारी राष्ट्राध्यक्ष अमरुल्‍ला सालेह यांच्या घरासह अन्य ठिकाणी बॉम्बफेक करण्यात आली होती. यानंतर काही वेळातच तालिबानने पंजशीरच्या राजधानीत घुसून गव्हर्नर हाऊसवर झेंडा फडकविल्याचे फोटो पोस्ट करत पूर्ण तालिबानवर ताबा मिळविल्याचा दावा करण्यात येत होता.

हे देखील पहा-

तालिबानच्या या आक्रमणामुळे पंजशीरचे शेर म्हटले जाणारे नेते पंजशीर सोडून पळून गेले आहेत. जमिनीवरून आक्रमण होत असताना पंजशीरच्या रेझिस्टंस फ्रंटचे कंबरडे मोडण्याकरिता पाकिस्तानी हवाई दलाने ड्रोन आणि लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे हल्ले चढविण्यात येत आहेत. यामध्ये अहमद मसूद यांचा जवळचा नेता फहीम दश्‍ती आणि टॉपचा कमांडर जनरल साहिब अब्‍दुल वदूद झोर हा मारला गेला आहे.

तालिबानच्या दाव्यानुसार त्यांनी पंजशीर घाटीवर ताबा मिळविला आहे. तर रेझिस्टंस फ्रंटचा दावा आहे की, अद्याप पंजशीर वरती त्यांचा ताबा आहे. यामुळे लढाई अद्याप संपलेली नाही. आज मध्यरात्री अज्ञात विमानांनी तालिबान मधील ५ तळांवर हल्ला केला आहे. यामध्ये काही दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले जात आहे. तालिबानच्या हजारो दहशतवाद्यांनी रातोरात पंजशीर मधील सर्व शहरे ताब्यात घेतल्याचे अनेक प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले जात आहे.

Taliban : परत हादरला! पंजशीरमधील ५ तळांवर अज्ञात विमानांचा एअरस्ट्राईक
Afghanistan : विमाने रोखल्याने शेकडो जण अडकले

यामुळे नॉर्दर्न रेझिस्टंस फ्रंटचे लढवय्ये आता पहाडींमध्ये गेले असल्याची माहिती मिळत आहे. तिथे गोरिल्ला युद्ध सुरु झाले आहे. याच भागात अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी आपला ठिकाणा बनवला आहे. पंजशीरवर तालिबानच्या कब्ज्याच्या दाव्यावर अहमद मसूद यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. नॉर्दन अलायंस रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणार आहे. पाकिस्तानच्या लढाऊ विमानाला आम्ही पाडले आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com