वृत्तसंस्था : अमेरिकेन अफगाणिस्तान मधील आमची राजवट अस्थिर करण्याचा प्रयत्न चुकून देखील करू नये, नाही तर परिणाम भोगायला सामोरे जावे लागणार असल्याचा स्पष्ट इशारा तालिबान कडून देण्यात आला आहे. तालिबानने अफगाणिस्तवर ताबा मिळवल्यावर अफगाणिस्तान मधून अमेरिकन सैन्याने माघार घेतली आहे. यानंतर पहिल्यांदाच तालिबान आणि अमेरिकेमध्ये चर्चा झाली आहे.
या चर्चेदरम्यान तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी अमेरिकेला इशारा दिला असल्याची माहिती मिळाली आहे. तालिबानने ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानवर परत एकदा ताबा मिळवला आहे. दरम्यान, तालिबानने जेव्हा पहिल्यांदा अफगाणिस्तान ताब्यात घेतले होते. तेव्हा अमेरिकेच्या पहिल्या लष्करी कारवाईनंतर तालिबानना सत्ता सोडावी लागली होती.
हे देखील पहा-
यामुळे अमेरिका परत तसाच प्रयत्न करू शकते, अशी भीती तालिबानला आहे. कतारची राजधानी दोहा या ठिकाणी अमेरिका आणि तालिबान मध्ये चर्चा रंगली होती. या चर्चेनंतर मुत्ताकीने अफगाणिस्तानची वृत्तसंस्था बख्तरशी बोलताना असे सांगितले की, 'अफगाणिस्तान मधील सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचे देखील चांगलं होणार नाही, असे आम्ही अमेरिकेला स्पष्टपणे सांगितले आहे.
एएफपीने अनुवादित केलेल्या रेकॉर्ड केलेल्या निवेदनामध्ये मुत्ताकी म्हणाले की, अफगाणिस्तान बरोबर चांगले संबंध असणं हे सर्वांकरिता चांगले असेल. अफगाणिस्तान मधील सध्याचे सरकार कमकुवत करण्यासाठी कोणी काही करू नये, अन्यथा यामुळे लोकांसाठी अनेक समस्या निर्माण होतील, अशा शब्दात अप्रत्यक्षपणे तालिबान कडून अमेरिकेला इशारा देण्यात आला आहे.
परराष्ट्र खात्याच्या उपविशेष प्रतिनिधी टॉम वेस्ट आणि यूएसएआयडीच्या सर्वोच्च मानवतावादी अधिकारी सारा चार्ल्स यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन टीम बरोबर २ दिवसांच्या चर्चेच्या पहिल्या दिवशी मुत्ताकींनी हे विधान करण्यात आले आहे. 'दोन्ही देशांचे एकमेकांशी चांगले संबंध असतील, असे आश्वासन अमेरिकेकडून देण्यात येत आहे. अफगाणिस्तान अतिशय कठीण काळातून जात असताना संयम बाळगणं आवश्यक आहे. संयम बाळगल्यास अफगाणिस्तान अधिक सामर्थ्याने या स्थितीतून बाहेर येईल, असे मुत्ताकी यांनी सांगितले आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.