वृत्तसंस्था : तालिबान्यांची Taliban अफगाणिस्तान Afghanistan मध्ये अशरफ घनी यांचे लोकशाही सरकार उलथवून लावण्यात आले आहे. आपले सरकार शेवटी स्थापन करण्यात यश आले आहे. मात्र, पंजशीर खोरे अहमूद मसूद आणि अमरुल्लाह सालेह यांच्या नेतृत्वात तालिबान बरोबर अजून देखील लढा देत आहेत. आता पंजशीर खोऱ्यामध्ये तालिबान किमान २० अफगाण नागरिकांना मारले असल्याचे समजत आहे.
हे देखील पहा-
ज्यात अतिरेकी आणि विरोधी दलांमध्ये जबरदस्त लढाई झाल्याचे बघायला मिळत आहे. बीबीसीने यासंबधी माहिती दिलेली आहे. पंजशीरचे खोरे आपण ताब्यात घेतले असल्याचे तालिबान्यांनी दावा केला आहे. दुसरीकडे रेजिस्टन्स फोर्सचे सांगणे आहे की, त्याच्याकडे अजून देखील पंजशीर खोऱ्याचा ६० टक्के भाग घेतला असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, बीबीसीच्या एका अहवाल मधून स्पष्टपणे सांगितले आहे की, आता पंजशीरमध्ये अफगाण नागरिकांचे रक्त सांडत असून आत्तापर्यंत तब्बल २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, बीबीसीच्या अहवालानुसार, तालिबान्यांकडून लक्ष करण्यात आलेल्या २० अफगाण नागरिकांमध्ये दुकानदाराचे देखील समावेश आहे. पंजशीर मधील एक व्हिडिओ सोशल मिडियावर गेल्या २ दिवसांपूर्वीच खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ज्यात तालिबानी लढाखे अफगाण नागरिकांच्या घराबाहेर आणि रस्त्यावर गोळ्या झाडताना दिसून येत आहेत. अफगाणिस्तान मधील एका न्यूज पोर्टलनुसार सांगण्यात आले आहे की, हा युवक पंजशीर मधील उत्तर आघाडीच्या सैन्यामधील एक सदस्य होता. त्याचा आणखी एक साथीदार तालिबानला आपले ओळखपत्र दाखवत राहिला आहे. मात्र, तालिबान्यांनी त्याचा अखेर खात्मा करण्यात आला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.