Navjot Singh Sidhu
Navjot Singh SidhuSaam Tv

नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगात जाणार,1998 च्या प्रकरणात SCने सुनावला एका वर्षांचा तुरुंगवास

1998 च्या रोड रेज प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली.
Published on

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1988 च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. रोड रेज प्रकरणी शिक्षेत वाढ करण्याच्या नवज्योत सिंग सिद्धूंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने नवज्योतसिंग सिद्धू यांना दोषमुक्त करण्याच्या मे 2018 च्या आदेशाचे पुनरावलोकन केले आहे. या आदेशानुसार सिद्धूला पंजाब पोलीस ताब्यात घेणार आहेत. आता आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत सिद्धूंना जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात आली आहे

काय आहे प्रकरण?

पतियाळा येथे 1988 मध्ये नवज्योत सिद्धू यांचे पार्किंगवरून भांडण झाले होते ज्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com