BrahMos Missile: अ‍ॅडव्हान्स वर्जनची यशस्वी चाचणी; लक्ष्याला अचूक भेदण्याची क्षमता...

BrahMos Missile Test: आयएनएस विशाखापट्टणमसह (INS Visakhapatnam ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे समुद्री व्हेरिएंट शत्रूची झोप उडवतील.
Successful testing of the advanced version of BrahMos Missile; Ability to penetrate the target accurately...
Successful testing of the advanced version of BrahMos Missile; Ability to penetrate the target accurately...Twitter/@indiannavy
Published On

नवी दिल्ली: भारतीय नौसेनेनं आणखी एक मोठं यश संपादन केलयं. भारतीय नौसेनेतली महत्वाची अशा ब्रम्होस मिसाईलच्या अ‍ॅडव्हान्स वर्जनची (BrahMos Missile Test) आज यशस्वीरीत्या चाचणी करण्यात आली. या चाचणी दरम्यान मिसाईलने आपल्या लक्ष्यावर अचूक मारा केला. या अ‍ॅडव्हान्स मिसाईलमुळे भारतीय नौसेनेची (Indian Navy) ताकद आणखीन वाढली असून लांब पल्ल्यापर्यंत मारा करण्यास भारतीय नौसेना आता अधिक सक्षम झाली आहे. (Successful testing of the advanced version of BrahMos Missile:; Ability to penetrate the target accurately ...)

हे देखील पहा -

आयएनएस विशाखापट्टणमसह (INS Visakhapatnam ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे समुद्री व्हेरिएंट शत्रूची झोप उडवतील. ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे चार प्रकार समुद्रातून डागले जाणार आहेत. पहिला - युद्धनौकेतून लाँच केलेला अँटी-शिप प्रकार (Anti-Ship Missile), दुसरा युद्धनौकेतून जमीनीवर हल्ला करणारा (Land-Attack Missile), हे दोन्ही प्रकार भारतीय नौदलात आधीपासूनच कार्यरत आहेत. तिसरा- पाणबुडीतून लाँच करता येणारा अँटी-शिप प्रकार (submarine launched anti ship missile) आणि चौथा- पाणबुडीतून लाँच केलेला लँड-अटॅ) (submarine launched land attack missile) प्रकार हे चार प्रकार सध्या भारतीय नौसेनेकडे आहेत.

भारतीय नौदलाने राजपूत क्लास डिस्ट्रॉयर INS रणविजय (INS Ranvijay) आणि INS रणवीरमध्ये (INS Ranvir) 8 ब्रह्मोस क्षेपणास्त्रांते लॉन्चर बसवले आहे. तलवार क्लास फ्रिगेट INS Tarkash, INS Teg आणि INS Trikand मध्ये 8 ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसह लाँचर बसवण्यात आले आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र शिवालिक वर्गाच्या फ्रिगेटमध्येही बसवण्यात आले आहे. कोलकाता क्लास डिस्ट्रॉयरमध्येही ते तैनात करण्यात आले आहे. त्यांची आयएनएस विशाखापट्टणम येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे आता भारताची ही यशस्वी चाचणी आत्मनिर्भर भारत मिशनच्या यशासाठी मैलाचा दगड मानली जात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com