Success Story : आदिवासी महिलेने प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी दिली TNPSC परीक्षा; दिवाणी न्यायाधीश बनून रचला इतिहास

Tribal woman V Sripathy Success Story: व्ही. श्रीपथीने तामिळनाडू लोकसेवा आयोगद्वारे (TNPSC) घेतल्या जाणाऱ्या दिवाणी न्यायालय न्यायाधीश परीक्षेत यश मिळवून पहिली आदिवासी महिला न्यायाधीश होण्याचा मान मिळवला आहे.
Tribal woman V Sripathy Success Story
Tribal woman V Sripathy Success StorySaam Digital
Published On

Success Story V Sripathy

आपल्या देशात आजही डोंगर कपाऱ्यांमधून अनेक गावांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये लोक राहतायेत. जिथे वीज, शिक्षण आणि मूलभूत सुविधांची आजही वानवा आहे. दरम्यान अशाच एका आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या आदिवासी महिलेने तामिळनाडू लोकसेवा आयोगद्वारे (TNPSC) घेतल्या जाणाऱ्या दिवाणी न्यायालय न्यायाधीश परीक्षेत यश मिळवून पहिली आदिवासी महिला न्यायाधीश होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे प्रसुतीनंतर दुसऱ्या दिवशी त्या परीक्षेला सामोरे गेल्या होत्या ते ही २५० किमीचा प्रवास करून. त्यामुळे या २३ वर्षीय महिलेचं राज्यभर कौतुक होत असून तरुण आणि महिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

दिवाणी न्यायालय न्यायाधीश व्ही. श्रीपथीने इतिहास रचला आहे. व्ही. श्रीपथी या तिरुपथूर जिल्ह्यातील पुलियूर गावातील मल्याळी जमातीतील येलागिरी हिल्सच्या रहिवासी आहेत. तिरुवन्नमलाई येथील राखीव जंगलाच्या सीमेवर असलेल्या थुविंजीकुप्पम येथे त्यांचा जन्म झाला असून कालियाप्पन आणि मल्लीगा यांच्या त्या मोठी मुलगी. राज्याच्या सर्वात मागासलेल्या डोंगराळ भागातून आली म्हणून नाही तर तिने आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांत परीक्षा दिली होती. त्यामुळे तिच्या या कामगिरीकडे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचंही लक्ष वेधलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी श्रीपतीच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. 'X' या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी याबाबत पोस्ट लिहिली आहे.'इतक्या कमी वयात एका आदिवासी डोंगराळ गावातल्या मुलीने हे यश संपादन केल्याचं पाहून मला आनंद झाला आहे. आमच्या द्रविड मॉडेल सरकारने तामिळ भाषेत शिक्षित लोकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य म्हणून आणलेल्या आदेशाद्वारे श्रीपथी यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे हे जाणून मला अभिमान वाटतो.तिच्या यशाला पाठिंबा दिल्याबद्दल तिच्या आई आणि पतीचे आभार! सामाजिक न्याय हा शब्द उच्चारण्याचे धाडस न करता तामिळनाडूत आलेल्या श्रीपथी सारख्या लोकांचं यश हे तामिळनाडूचे उत्तर आहे.'

Tribal woman V Sripathy Success Story
Shocking News: खळबळजनक! भाजप नेत्याच्या मुलीची आत्महत्या, विनयभंगाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी देखील व्ही श्रीपथी यांचं 'X' वर कौतुक केलं आहे,'तमिळ माध्यमात शिकलेल्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यासाठी आमच्या द्रविड मॉडेल सरकारच्या अध्यादेशाचा आम्हाला आनंद आहे. श्रीपती यांची न्यायशास्त्र न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. विशेषत: मुलाला जन्म दिल्यानंतर दोन दिवसांनी परीक्षा देण्याच्या कठीण परिस्थितीत. आपला जीव धोक्यात घालून परीक्षेसाठी लांबचा प्रवास करण्याचा त्याचा निर्धार वाखाणण्याजोगा आहे. इतरांसाठी आदर्श असलेल्या श्रीपतीची स्वप्ने जगा, कारण शिक्षण हीच अविनाशी संपत्ती आहे.

नोव्हेंबर 2023 मध्ये चेन्नई येथे 250 किमी दूर परीक्षा दिली होती आणि काही दिवसांपूर्वी अंतिम निवडीसाठी मुलाखत दिली होती. या पदावर निवड झाल्यानंतर त्यांच्या गावी ढोल, हार आणि भव्य मिरवणुकीसह स्वागत समारंभही आयोजित करण्यात आला होता. श्रीपतीने बीए आणि बॅचलर ऑफ लॉ करण्यापूर्वी आपले शिक्षण येलागिरी हिल्समध्ये पूर्ण केले आहे.

Tribal woman V Sripathy Success Story
Farmers Protest : दिल्लीच्या सीमेवर प्रचंड तणाव; शेतकरी-पोलिसांमध्ये रात्रभर धुमश्चक्री

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com