Student Used ChatGPT In Exam: परीक्षेत कॉपी करणारे विद्यार्थी काय काय शक्कल लढवतील हे सांगता येत नाही. असंच एक प्रकरण तेलंगाणातून समोर आलं आहे. तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विद्यार्थ्याने चक्क आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सचा ChatGPT चा वापर करून कॉपी केल्याचे समोर आले आहे.
तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाचं (TPSSC) प्रश्नपत्रिका लीक प्रकरण ही कदाचित देशातील एकमेव अशी घटना असेल जिथे व्यवस्थेची फसवणूक करण्यासाठी परीश्रार्थीने ChatGPT या आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सचा वापर केला आहे. तेलगणा पेपरफुटी प्रकरणात चौकशी करण्यासाठी एका विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमणूक करण्यात आली आहे.
या एसआयटीला तपासादरम्यान एका आरोपीने सहाय्यक कार्यकारी अभियंता (AEE) आणि विभागीय लेखा अधिकारी (DAO) भरतीसाठी प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर उत्तरे मिळविण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे असे आढळून आले.
ब्लूटूथ इअरबड्सचा केला वापर
या प्रकरणातील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ब्लूटूथ इअरबड्स घातलेले होते आणि आरोपीने लीक झालेल्या पेपरमधील प्रश्न वाचून त्याची उत्तरे परीक्षार्थींना ब्लूटूत इअरबड्द्वारे दिली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने आतेलंगणा स्टेट नॉर्दर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेडचे विभागीय अभियंता पूला रमेश यांना पेड्डापल्ली येथे ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली तेव्हा ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपीने 7 उमेदवारांना दिली उत्तरे
रमेशला किमान तीन परीक्षांच्या लीक झालेल्या प्रश्नपत्रिकांचे अॅक्सेस मिळाले होते. त्यातील दोन परीक्षांमध्ये त्याने उत्तरे मिळवण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर केला. तपासाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 22 जानेवारी आणि 26 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या दोन परीक्षांसाठी बसलेल्या 7 उमेदवारांना उत्तरे देण्यासाठी रमेशने एक विस्तृत योजना आखली होती. त्याने सर्व सातही ब्लूटूथ मायक्रो इअरबड्स परीक्षार्थींना कानात घालण्यासाठी दिले होते. (Breaking News)
मुख्याध्यापकांनी प्रश्नपत्रिकांचे फोटो पाठवले?
परीक्षा केंद्रावरील मुख्याध्यापकांनी प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून परीक्षा सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांनी रमेशला पाठवल्याचे समजते. रमेश त्याच्या चार सहकाऱ्यांसोबत दुसऱ्या ठिकाणी बसला होता. त्याने चॅटजीपीटीचा वापर करून अचूक उत्तरे मिळवली आणि ती उमेदवारांना इअरबड्सच्या माध्यमातून सांगितली. धक्कादायक माहिती म्हणजे या 7 उमेदवारांपैकी प्रत्येकाने उत्तीर्ण होण्यासाठी मदत करण्यासाठी रमेशा 40 लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.