Student Dies During National Anthem : हृदयद्रावक! शाळेत राष्ट्रगीत सुरु असताना विद्यार्थिनीचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू

Student Dies News : पेलिशा असं १६ वर्षीय मृत विद्यार्थिनीचं नाव आहे.
Student Dies During National Anthem
Student Dies During National AnthemSaam TV

Karnataka Crime News : शाळेत राष्ट्रगीत सुरु असतानाच विद्यार्थिनीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये ही घटना घडली आहे. शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना तत्काळ विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांना तिला मृत घोषित केलं.

पेलिशा असं १६ वर्षीय मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. विद्यार्थिनी या शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. शाळा व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, दररोजप्रमाणे बुधवारी सकाळी शाळेतील सर्व मुले राष्ट्रगीत म्हणत होती. यादरम्यान विद्यार्थ्याची प्रकृती खालावली. (Latest Marathi News)

Student Dies During National Anthem
Ahmednagar Crime News : पत्नीला फिरायला नेलं अन् तिथेच संपवलं; सॅनिटरी पॅडमुळे मामा-भाचा गजाआड, हत्येचं कारणंही आलं समोर

सुरुवातीला शाळेतील शिक्षकांना वाटले की तिला चक्कर आली आहे. मात्र पेलिशाची तब्येत आणखी बिघडू लागली. यानंतर शिक्षकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी विद्यार्थिनीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.  (Breaking Marathi News)

Student Dies During National Anthem
Parbhani News: खेळता- खेळता चार वर्षीय बालक पडला बोअरवेलच्या खड्ड्यात

विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आला असावा, असं डॉक्टरांना म्हटलं. पेलिशा अनाथ असल्याने शाळेच्या वसतिगृहातच ती राहत होती. या घटनेने शाळेतील शिक्षक व मुलांना मोठा धक्का बसला आहे. शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पेलिशा हुशार आणि मेहनती मुलगी होती. ती आता या जगात नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com