नवी दिल्ली: दिल्लीतून (Delhi) दुबईला जाणारे स्पाईसजेट विमानचे आज अचानक लँडिंग करण्यात आले. या विमानाचे लँडिंग पाकिस्तानमधील (Pakistan) कराची येथे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्पाईसजेटच्या इंडिकेटर लाईटमध्ये बिघाड झाल्यामुळे या विमानाचे लँडिंग केले आहे. स्पाईसजेटमध्ये १०० पेक्षा जास्त प्रवासी होते. या प्रवाशांना सुरक्षित कराचीमध्ये उतरले आहे.
आज ५ जुलै रोजी स्पाईसजेट B737 विमान (Flight) SG-11 हे दिल्ली-दुबई या विमानातील इंडीकेटर लाईटमध्ये बिघाड झाला असल्यामुळे कराचीच्या बाजूला वळवण्यात आले. विमानाचे कराचीमध्ये सुरक्षित लँडिंग करण्यात आले आहे. यादरम्यान कोणत्याही आपत्कालीन उतरण्यात आले नाही, तर विमानाने सामान्य लँडिंग केले.
विमान उड्डाण करत असताना कोणत्याही खराबीचा अहवाल नव्हता. विमानात या अगोदर कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड नव्हता मात्र, अचानक विमानाच्या इंडिकेटरमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. विमानातील प्रवाश्यांना सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आले असून लवकच त्यांना दुसऱ्या विमानाने दुबई नेण्याची सोय करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.