नात्यात प्रेम व्यक्त करणं खूप गरजेचं असत. कारण मनातील भावना व्यक्त केल्याशिवाय कोणीही आपल्या मनात सुरुये हे ओळखू शकत नाही. पण कधी आणि कुठे व्यक्त व्हायचं हेही लोकांना नीट कळायला हवं, कारण अशा प्रसंगी नकार आला तर, अपमान होण्याचा धोकाही वाढतो. नुकतेच दक्षिण आफ्रिकेतील एका McDonald’s च्या रेस्टॉरंटमध्ये असेच काही घडले (South African man proposed girlfriend in restaurant viral video) जिथे एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज केले पण तिने त्याला नकार दिला...
एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) जोहान्सबर्गमध्ये एक घटना घडली आहे. याचा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना हसूही येत आहे अन् वाईटही वाटत आहे. व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, एक पुरुष गर्दीत महिलेला प्रपोज करत आहे, महिलेला त्याच्या प्रपोजल अजिबात आवडलेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सँडटन सिटी मॉलमधील मॅकडोनाल्डमध्ये ही घटना घडली. रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर देणाऱ्यांची मोठी रांग लागली आहे. त्याच रांगेत एक स्त्री उभी होती आणि तिच्या मागे एक व्यक्ती होता. त्याच रांगेत गर्दीमध्ये, तो व्यक्ती त्याच्या एका गुडघ्यावर बसला आणि त्याच्या प्रेमिकेसमोर त्याने एक अंगठी केली. हे पाहून महिलेला धक्काच बसला आणि तिने त्या व्यक्तीवर संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. तो व्यक्ती तिथे जवळपास ३ मिनिटे बसून राहिला पण ती त्याची प्रेमिका बहुतेक त्याच्यावर चिडलेली दिसून येत आहे. (Woman turned down boyfriend’s proposal in McDonald’s). दरम्यान, लोकांनी तिला हे प्रोपोजल एक्सेप्ट करण्यास चिअर केलं पण मात्र ती रागाच्या भरात तेथून निघून गेली.
तर, 28 एप्रिल रोजी @Madame_Fossette नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला 35 लाखांहून अधिक व्ह्यूज (Views) मिळाले आहेत. काही लोकांनी तीच घटना वेगळ्या अँगलने रेकॉर्ड केली आहे आणि त्याचा व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट केला आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये असे दिसते की जेव्हा त्याने तिला प्रपोज केले तेव्हा सर्वजण मागे सरकतात आणि महिला एकटीच ऑर्डर देत आहे. तर पुरुष तिच्या मागे गुडघ्यावर बसलेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.