Snake Viral Video: काय सांगता! भल्यामोठ्या सापाने चक्क जांभई दिली अन्...; पाहा भयावह व्हिडिओ

Snake Yawning: यामध्ये एक साप माणसांप्रमाणे चक्क जांभई देताना दिसत आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV

Snake Yawn : झोप आल्यावर वर्गात किंवा मग ऑफिसच्या मीटिंगमध्ये असलं तरी अनेक व्यक्तींना जांभई आवरत नाही. आजवर तुम्ही कुत्रा, मांजर अशा प्राण्यांना जांभई देताना नक्कीच पाहिलं असेल. मात्र तुम्ही कधी सापाला जांभई देताना पाहिलंय का? अता असा प्रश्न ऐकूण तुम्हालाही विचित्र वाटलं असेल. हा काय प्रश्न आहे असं तुम्हाला वाटत असेल. मात्र प्रत्यक्षात असा एक व्हिडिओ समोर आला आहे. (Snake Viral Video News)

साप हा सरपटणारा प्राणी आहे. सापाचे अनेक अतरंगी आणि भयानक व्हिडिओ तुम्ही आजवर पाहिले असतील. मात्र हा व्हिडिओ थोडा जास्तचं भयानक आणि झोप उडवणारा आहे. यामध्ये एक साप माणसांप्रमाणे चक्क जांभई देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लाल आणि सफेद रंगाचा हा साप सरपटत समोर येतो. त्यानंतर अचानक तो जबडा उघडतो. त्याला काही खायचे असावे म्हणून तो असं करत आहे असं सुरूवातीला वाटतं.

Viral Video
Viral News : नवरीने वरमाला घालताच नवरदेव स्टेजवर कोसळला; जागीच गेला जीव, धक्कादायक कारण उघड

मात्र साप नंतर त्याचा खालचा जबडा फिरवतो आणि जसजसा तो जबडा उघडतो तस तसा एक मोठा आवाज ऐकू येत आहे. यामध्ये साप जोरात ओरडताना दिसत आहे. सापाचं हे दृश्य खरोखर मन विचलीत करणारं आहे. हॉलिवूड हॉरर मिम्स या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.

Viral Video
Cricket Viral Video: डांसिग अंपायरचा चंद्रा गाण्यावर मंत्रमुग्ध करणारा डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

अवघ्या १० सेकंदाच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत १ लाखांहून अधिक व्यक्तींनी हा व्हिडिओ पाहिला आहे. साप कोणावर हल्ला करताना, खाताना किंवा अन्य कोणत्याही गोष्टी करताना सापाचे अनेक व्हिडिओ तुम्ही आजवर पाहिले असतील. मात्र हा व्हिडिओ खरोखर डोक्याला विचार करण्यास भाग पाडणारा आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काहीजण व्हिडिओ पाहून घाबरलेत तर काहींनी हे इडिट केल्याचं म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com