Snake on United Flight sends passengers into panic
Snake on United Flight sends passengers into panicSaam Tv

Viral News : बापरे! उडत्या विमानात अचानक निघाला साप; प्रवाशांची आरडाओरड, पुढे काय झालं?

कल्पना करा विमान आकाशात मोठ्या उंचीवर असेल आणि प्रवाशांना विमानातच साप (Snake) दिसला तर काय होईल?

Viral News : साप असं जर नावही ऐकलं तर भल्याभल्यांना घाम फुटतो. साप पाहिल्यावर सर्वांचीच घाबरगुंडी उडते. रस्त्यावरून येताना किंवा जाताना साप दिसला तर अनेकजण त्याठिकाणाहून काढता पाय घेतात. पण कल्पना करा विमान आकाशात मोठ्या उंचीवर असेल आणि प्रवाशांना विमानातच साप (Snake) दिसला तर काय होईल? असाच काहीसा एक प्रकार फ्लोरिडाच्या टाम्पा शहरातून उघडकीस आला आहे. (Snake Viral Video)

Snake on United Flight sends passengers into panic
Crime News : दिल्लीच्या महिलेवर उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार; अपहरणानंतर २ दिवसांपासून सुरू होते अत्याचार

वाशिंगटन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, प्लोरिंडाच्या टाम्पा शहरातून नेहमीप्रमाणे एका विमानाने प्रवाशांना घेऊन उड्डाण भरली. हे विमान लिबर्टी शहराकडे जाण्यासाठी निघाले होते. विमानाने उड्डाण भरताच प्रवाशांनी नेहमीप्रमाणे खाणं पिणं मौज मजा सुरू केली. प्रवासात जवळपास दोन तासांचा अवधी लोटला. आता काही वेळातच विमान धावपट्टीवर उतरणार होते.

इतक्यात विमानाच्या बिजनेस क्लासमधील एका प्रवाशाला आपल्या सीटखाली साप असल्याचं दिसून आलं. या प्रवाशाने धावत्या विमानातच झटकन आपला सीटबेल्ट काढला आणि आरडाओरड सुरू केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे (Viral News) प्रवाशांची मोठी धावपळ उडाली.

Snake on United Flight sends passengers into panic
Viral News : फटाक्याची वात पेटवल्यानंतर माजी आमदार पळता पळता तोंडावर पडले, पाहा VIDEO

दरम्यान, विमानातील एअर हॉस्टेस तसेच इतर कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना शांत करून सापापासून दूर नेलं. थोड्याच वेळात विमानाची धावपट्टीवर उतरलं. विमान धावपट्टीवर उतरताच, तेथे सर्पमित्र उपस्थित होते. सर्पमित्र तसेच इतर कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना तातडीने खाली उतरवलं.

न्यूयॉर्क पोस्टने सिंपल फ्लाइंगच्या हवाल्याने म्हटले आहे. प्रवाशांना त्यांच्या सामानासह खाली उतरवण्यात आल्यानंतर सर्पमित्रांनी विमानाचा कानाकोपरा तपासला. मात्र, त्यांना काही विमानात साप दिसून आला नाही. दरम्यान, विमानात प्रवाशांना दिसून आलेला साप कुठे गेला? हे अद्यापही कळलं नाही. खरचं विमानात साप होता का? की प्रवाशाला तसा भास झाला असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com