वॉशिंग्टन : आकाशात पाहिल्यावर अंतराळात प्रवास करावा, असे प्रत्येकाला वाटते. जवळ जाऊन अंतराळाला एक्स्प्लोर Explore करावे असे वाटते. मोठेपणी मी ऍस्ट्रोनॉट बनणार असं प्रत्येक लहान मुलं सांगत असते. परंतु, प्रत्येकाला असा करण शक्य नसतं. मात्र काही व्यक्ती यात नशीबवान ठरतात. त्यांना अशी संधी मिळते.. आणि भारताची सिरीशा बांदला Sirisha Bandala हे त्यापैकीच एक नाव म्हणता येईल. Sirisha of Indian descent will take a leap into space
रिचर्ड ब्रेनसन Richard Branson व्हर्जिन गॅलॅक्टिकचे मालक आणि प्रसिध्द उद्योगपती हे येत्या 11 जुलैला अंतराळ सफरीसाठी रवाना होणार आहेत. यावेळी भारतीय वंशाची सिरीशा बांदला देखील त्यांच्यासोबत अंतराळात जाणार आहे. व्हर्जिन गॅलॅक्टिक Virgin Galactic कंपनीमध्ये सरकारी कामकाज आणि संशोधन कार्याशी संबंधित सिरीशा बांदला ह्या अधिकारी आहेत. अन्य 5 जण रिचर्ड यांच्यासोबत अंतराळ Space प्रवासासाठी जात आहेत.
भारतात India जन्मलेली सिरीशा ही अशा तुफान अनुभवाला अंतराळच्या प्रवासाला जाणारी दुसरीच महिला आहे. सिरीशाचे आंध्र प्रदेशातील Andhra Pradesh गुंटूर Guntur हे मूळ गाव आहे. यापूर्वी दिवंगत अंतराळ शास्त्रज्ञ कल्पना चावला Kalpana Chawla या अंतराळात गेल्या होत्या. परंतू स्पेस शटल कोलंबियाच्या दुर्घटनेत त्यांचा दुर्देवाने मृत्यू झाला. 2015 मध्ये सिरीशा बांदलाने व्हर्जिन कंपनी जॉईन केली होती.
व्हर्जिन ऑर्बिटचे वॉशिंग्टन Washington येथील कामकाज सिरीशा बांदला पाहते. नुकतेच या कंपनीने बोईंग 747 विमानाच्या मदतीने एक उपग्रह Satellite अंतराळात पाठवला होता. तर सिरीशाचे शिक्षण जॉर्ज टाऊन युनिव्हर्सिटीतून एमबीए MBA केलेले आहे. सिरीशा ही कल्पना चावला Kalpna Chawala यांच्यानंतर अंतराळात जाणारी दुसरी भारतीय महिला ठरणार आहे. राकेश शर्मा भारताकडून सर्वप्रथम अंतराळात गेले होते. कल्पना चावला त्यांच्यानंतर अंतराळात गेल्या होत्या. तसेच अंतराळावर भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स यांनी देखील पाऊल ठेवलेले आहे. अमेरिकेतील अंतराळयान कंपनी व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या रिचर्ड ब्रेनसन यांनी आपले सहकारी अब्जाधीश जेफ बेझोस Jeff Bezos यांच्या ९ दिवस आधी अंतराळ यात्रेचे नियोजन केले आहे.
गुरुवारी संध्याकाळी ब्रेनसन यांच्या कंपनीने जाहिर केले की 11 जुलै रोजी त्यांचे पुढील अंतराळ उड्डाण होईल. तसेच या सफरीमध्ये संस्थापकांसह अन्य 6 जण सहभागी होतील. हे न्यू मेक्सिको New Mexico येथून अंतराळ यान उड्डाण करेल. सर्व क्रू सदस्य या यानाचे कंपनीचे कर्मचारी असतील. हे व्हर्जिन गॅलॅक्टिकचे अंतराळात चौथे उड्डाण असेल. एरोस्पेस क्षेत्रातील एक अग्रणी महिला यावेळी त्यांच्या समावेत असेल. विशेष म्हणजे ही महिला अंतराळात जाण्यासाठी 60 वर्षांपासून प्रतीक्षा करीत आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.