Shraddha Walkar Case: श्रद्धाची शेवटची चॅटिंग आली समोर, मित्राला 'ती' बातमी सांगायची राहूनच गेली

. आतापर्यंत समोर आलेल्या चॅट्सपैकी हे श्रद्धाचे सर्वात शेवटचे चॅट आहे.
Shraddha case
Shraddha case Saam TV
Published On

नवी दिल्ली : श्रद्धा वालकरच्या हत्येच्या पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता श्रद्धा वालकरचं मृत्यूपूर्वीचं शेवटचे चॅट समोर आलं आहे. हत्येच्या काही तास आधी तिने केलेली चॅटिंग पोलिसांच्या हाती लागली आहे. मला एक बातमी मिळाली आहे, असं श्रद्धाने आपल्या चॅटिंगमध्ये मित्राला सांगितलं होतं.

श्रद्धा वालकरने 18 मे रोजी हत्येच्या काही तास आधी सायंकाळी सुमारे साडेचार वाजता तिच्या मित्राला मेसेज केला. आतापर्यंत समोर आलेल्या चॅट्सपैकी हे श्रद्धाचे सर्वात शेवटचे चॅट आहे. यात श्रद्धाने मित्राला लिहिले आहे की 'मला बातमी मिळाली आहे. मी खूप व्यस्त आहे. (Latest Marathi News)

Shraddha case
Crime News : पतीच्या मृतदेहाजवळ बसून खीर-पुरी खाल्ली, व्रतही केले; ६ महिन्यांनी पत्नीचं क्रूर कृत्य उघड

मित्राने श्रद्धाला विचारले की कोणत्या बातमीबद्दल बोलत आहे, तेव्हा श्रद्धाने याला कोणतेही उत्तर दिले नाही. श्रद्धा आणि आफताबच्या मित्रासोबतचं हे चॅट आहे. त्यानंतर काही दिवसांनी त्या मित्राने पुन्हा एकदा तू कुठे आहेस हे विचारण्यासाठी मेसेज केले होते. (Crime News

Shraddha case
Shraddha Walker-Aftab Case: श्रद्धा वालकर प्रकरणी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, तपास सीबीआयकडे सोपवणार?

श्रद्धाच्या मृत्यूनंतर 4 महिन्यांनी इन्स्टाग्रामवरून आफताबने श्रद्धाच्या मित्राला मेसेज केले होते. 'श्रद्धाला सांग मला कॉल करायला', असं आफताबने म्हटलं होतं. यावरून आफताबला हे दाखवायचे होते की श्रद्धा त्याला सोडून गेली आहे. तसेच तो तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे.

पोलिसांना 2020 मध्ये लिहिलं होतं पत्र

श्रद्धानं महाराष्ट्र पोलिसांना २३ नोव्हेंबर २०२० रोजी पत्र लिहिलं होतं. त्यात तिनं आफताबविरुद्ध तक्रार दाखल केली होती. ब्लॅकमेलिंग आणि प्राणघातक हल्ला होण्याची भीती तिनं या पत्रात व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com