Shoking News: बापरे! पोटात दुखू लागले म्हणून दवाखान्यात गेली, ऑपरेशन करताना डॉक्टरही हादरले; पोटातून काढले तब्बल १०००...

Chennai Shoking News: शस्त्रक्रियेनंतर महिला सुखरुप असल्याचंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.
Chennai News
Chennai NewsSaamtv
Published On

Chennai News: काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये (Delhi) एका तरुणाच्या पोटातून चक्क बियरची बाटली काढल्याची घटना समोर आली होती. या धक्कादायक प्रकाराची संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर आता आणखी एक अशाच प्रकारची भयानक घटना समोर आली आहे. जी वाचल्यावर तुम्हीही थक्क व्हाल.

ही संपूर्ण घटना चेन्नईमधील असून डॉक्टरांनी एका महिलेवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून एक दोन नव्हे तर तब्बल १२४१ खडे बाहेर काढले आहेत. डॉक्टरांनी जेव्हा हे खडे बाहेर काढत होते तेव्हा खड्यांची सख्या पाहून त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर महिला सुखरुप असल्याचंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित ५५ वर्षीय महिला ही पश्चिम बंगालमध्ये राहणारी असून ५५ तिला मधुमेहाचा त्रास होता. सतत पोटदुखी, अपचन, पोटात गॅस, भूक न लागणे, होणे अशा अनेक समस्या तिला होत्या. आठवडाभरापूर्वी तिची प्रकृती जास्तच बिघडल्यानंतर तिला चेन्नईतील (Chennai) डॉ. मोहन यांच्या डायबिटीज स्पेशालिटी सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

या रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेच्या पोटाचा अल्ट्रासाऊंड केला. अल्ट्रासाऊंड रिपोर्ट्स पाहून डॉक्टरदेखील थक्क झाले, कारण या महिलेच्या पित्ताशयात एक दोन नव्हे तर तब्बल १२४१ छोटे खडे तयार झाल्याचं डॉक्टरांना समजलं. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.

एसआरएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. आर बालमुरुगन यांनी महिलेवर उपचार केले. या महिलेची लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टोमी करण्यात येणार होती. डॉक्टरांनी या वेळी योग्य वेळी उपचार केले नसते तर महिलेचे पित्ताशय फुटण्याचाही धोका होता. डॉक्टरांनी वेळीच रोगाचे निदान करुन योग्य उपचार केल्याने महिलेचे प्राण वाचले असल्याची माहिती ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. ब्रिजेंद्र कुमार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com