
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत देशात सरकारी शाळा बंद होण्याचं प्रमाण वाढलं आहे. युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन (UDISE Report 2018-19) प्लसच्या रिपोर्टमधून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. रिपोर्टनुसार, मागील काही वर्षांमध्ये देशातील सरकारी शाळांच्या संख्येत लक्षणीय घट झाली, तर खासगी शाळांची संख्या अधिक वाढली आहे. UDISE ने जाहीर केलेल्या 2018-19 च्या अहवालानुसार देशातील 50 हजारांहून अधिक सरकारी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. (Government Schools Closed UDISE Report Latest News)
कोरोना महामारीच्या काळात सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या वाढली. या काळात आर्थिक संकटाचा सामना करावा लागल्यानंतर अनेक पालकांनी आपल्या मुलांना खासगी शाळांमधून काढून सरकारी शाळेत घातले. त्यामुळे खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली. असं असून सुद्धा गेल्या दोन ते तीन वर्षांत सरकारी शाळा बंद होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
UDISE ने 2018-19 च्या जाहीर केलेल्या अहवालानुसार देशातील 50 हजारांहून अधिक सरकारी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. अहवालानुसार, 2018-19 मध्ये देशात सरकारी शाळांची संख्या 1,083,678 इतकी होती. मात्र, 2019-20 मध्ये ही संख्या 1,032,570 वर आली आहे. म्हणजेच या कालावधीत देशभरातील तब्बल 51,108 सरकारी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारी शाळा बंद होत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
सरकारी शाळा बंद होण्याचं सर्वाधिक प्रमाण उत्तरप्रदेशात आहे. उत्तरप्रदेशात सरकारी शाळांच्या तब्बल 26,074 इतक्या शाळा बंद पडल्या आहेत. 2018 मध्ये उत्तरप्रदेशात सरकारी शाळांची संख्या 1,63,142 इतकी होती. जी सप्टेंबर 2020 मध्ये 1,37,068 वर आली आहे. दुसरीकेड मध्य प्रदेशातही सरकारी शाळा बंद होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात मध्यप्रदेशात 22,904 सरकारी शाळा बंद झाल्या आहेत. सप्टेंबर 2018 मध्ये येथील शाळांची संख्या 122,056 होती जी सप्टेंबर 2020 मध्ये घटून 99,152 इतकी झाली.अहवालानुसार, बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यात खाजगी शाळांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.