Shivsena Symbol : धनुष्यबाणाचं भवितव्य कधी ठरणार? मोठी अपडेट आली समोर

धनुष्यबाण चिन्हाचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या सुनाणवीनंतर ठरणार आहे.
Shivsena Symbol Row
Shivsena Symbol Rowsaam tv
Published On

Shivsena Symbol Row News : शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात मागच्या वाद सुरू आहे. धनुष्यबाण चिन्हाचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या सुनाणवीनंतर ठरणार आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग आताच निकाल देणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर आयोग निकाल देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) १० फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी निवडणूक आयोग शिवसेनेबाबत (Shivsena) निर्णय देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोग आत्ताच निकाल देणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोग निकाल देण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? यावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात १४ फेब्रुवारीपासून होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी निवडणूक आयोगानं निकाल देऊ नये, असा उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी मुद्दा मांडला होता.

या प्रकरणावर निवडणूक आयोगाच काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.मात्र, धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात १४ फेब्रुवारी सुनावणी झाल्यानंतर निवडणूक आयोग त्यांचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.

Shivsena Symbol Row
Sushma Andhare News : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना संपविण्याचा घाट घातलाय; सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणूकीपूर्वी निर्णय नाही

महाराष्ट्रातील दोन जागेसाठी कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणूकीपुर्वी शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाचा निर्णय घेण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आता अंधेरी पोटनिवडणूकीपूर्वी निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं असल्यानं या संदर्भात तात्काळ निर्णय घेतला जाणार नाही ,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघात अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. त्यामुळं निवडणूक आयोग आज काहीतरी निर्णय देईल अशी शक्यता व्यक्त केली जात असताना निवडणूक आयोग तात्काळ कोणताही निर्णय देणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Shivsena Symbol Row
Aaditya Thackeray : 'वरळीत काय ठाण्यात देखील लढेन'; आदित्य ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री शिंदे यांना ललकारलं

सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी होणार

सर्वोच्च न्यायालयात देखील राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे. येत्या १४ फेब्रुवारीपासून या प्रकरणावर सलग सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग जो पर्यंत सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निर्णय देत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय देणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंदर्भात येत्या 14 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com