Shivsena Crisis : आदित्यसह ठाकरे गटाच्या आमदारांना व्हिप बजावणार? शिंदे गटाने विषयच संपवला!

Shinde Vs Thackeray: शिवसेनेने व्हीप बजावण्याच्या निर्णयावर पडदा टाकला असून शिवसेना व्हीप बजावणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
Eknath shinde Vs uddhav thackeray
Eknath shinde Vs uddhav thackeray Saam TV

नवी दिल्ली : शिवसेना कुणाची ? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे ? असा संघर्ष सुप्रीम कोर्टात सुरू आहे. कोर्टात सुरू असलेला संघर्ष निर्णायक वळणार आला आहे. या लढाईत ठाकरे गटाचे आमदारांचे अस्तित्व रद्द करण्यासाठी शिवसेनेने (शिंदे गट) तयारी केली होती. शिवसेना (शिंदे गट) व्हीप बजावून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करणार का, या प्रश्नावरून अनेक उलटसुलट चर्चा सूरू होत्या. मात्र, निर्णयावर शिवसेनेने (शिंदे गट) पडदा टाकला असून शिवसेना (शिंदे गट) व्हीप बजावणार नाही हे स्पष्ट झाले आहे. (Latest Marathi News)

शिवसेना व्हीप बजावून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र, अधिवेशनात शिवसेना (शिंदे गट) व्हीप बजावणार नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे .

Eknath shinde Vs uddhav thackeray
Shivsena Crisis : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांना, कोर्टात काय घडलं?

अधिवेशनात शिवसेनेने (Shivsena) (शिंदे गट) व्हीप जारी केला तर उरलेले आमदार अपात्र होतील, अशी भूमिका सिब्बल यांनी मांडली होती. याबाबत मुख्य न्यायाधीश यांनी विचारले असताना शिवसेनेच्या (शिंदे गट) वकिलांनी नाही असे उत्तर दिले आहे . त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार यांना व्हीप लागू होणे किंवा आमदार अपात्र होणे असे काही अर्थसंकल्प अधिवेशनात होणार नाही. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Eknath shinde Vs uddhav thackeray
Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा दिलासा! 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाव आणि चिन्ह कायम राहणार!

सुप्रीम कोर्टात आज दोन मोठे दिलासे मिळाले आहे. अधिवेशनात शिवसेना व्हीप लागू केला तरी तो त्यांना लागू होणार नाही,त्या आधारावर आमदार अपात्र होणार नाही. तर सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि चिन्ह मशाल राहील. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com