शाळेच्या आवारात बस मागे घेताना चाकाखाली येऊन बालकाचा दूर्देवी मृत्यू

सहा वर्षीय विद्यार्थी बालकाचा गाडी खालून चिरडून मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी शाळेच्या परिसरात प्रशासनाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला.
School Bus
School BusSaam Tv

बागपत : बसचालक शाळेची बस मागे घेताना त्याचा गाडीच्या चाकाखाली येऊन सहा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू (Student Death) झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या लहान बालकाचा मृत्यू झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर जमा होऊन एकच आक्रोश केला. सदर ठिकाणी संतापलेल्या नातेवाईकांनी शाळेच्या प्रशासन (School Administration) आणि बस चालकावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. दोषींवर कारवाई केल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका उपस्थित लोकांनी घेतली. त्यावेळी घटनास्थळी(Police)स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येत पोहोचत उपस्थित जमावाला आटोक्यात आणले.

School Bus
Singham Returns : तरुणीला वाचवण्यासाठी मुंबईच्या सिंघमनं स्वतःवर झेलले चाकूचे वार

सदरठिकाणी पोलिसांनी उपस्थित लोकांचा आक्रोश शांत केला. दूर्देवी प्रकारानंतर संतापलेल्या उपस्थित लोकांना पोलिसांनी समजावून बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना चांदीनगर क्षेत्रातील चंद्रावल रोडस्थित खासगी शाळेतील आहे. चमरावल या विभागातील रहिवाशी असलेले अरुण यांचा ६ वर्षीय मुलगा पांची-चमरावल मार्गावरील शाळेत मोठा शिशूच्या वर्गाचा विद्यार्थी होता. आयुष हा सकाळी साडे आठच्या दरम्यान शाळेजवळ पोहोचला. त्यावेळी शाळेच्या आवारात बसचालक शाळेची बस मागे घेत होता. नेमक्या त्याचवेळी आयुष गाडीच्या चाकाखाली आला. त्याच दरम्यान आयुष बसची जोरदार धडक बसली. यावेळी सहा वर्षीय विद्यार्थी गाडी खाली आल्याने त्याचा जागीच चिरडून मृत्यू झाला.

सहा वर्षीय विद्यार्थी बालकाचा मृत्यू झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी शाळेच्या परिसरात प्रशासनाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला. बसचालकावर निष्काळजीपणे गाडी चालवण्याचा आरोप करत लोकांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचत लोकांना शांत केले. त्यानंतर पोलिसांनी उपस्थितांची समजूत काढून मृत सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळील रुग्णालयात पाठवण्यात आला. 'सदर घटना दूर्देवी असून या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच या प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच शाळेच्या , अशी माहिती बागपतचे पोलिस अधिकारी राजकमल यादव यांनी दिली आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com