Viral Video : पठ्ठ्या जोमात, पब्लिक कोमात; मगरीवर बसून चालवली बाईक, पाहून म्हणाल, शॉक लगा लगा...

मगर सीटवर ठेऊन हा महानग त्या मगरीवर बसला आहे
Viral Video
Viral VideoSaam TV

Viral Video : जंगलातल्या हिंस्र प्राण्यांमध्ये मगर एक आहे. मगरीचं नाव ऐकताचं अनेकांना घाम फुटतो. जंगलातील प्राणी देखील लांबूनच मगर दिसली तरी स्वत:चा रस्ता बदलतात. अशात सोशल मीडियावर नेहमीच अशा अनेक घटना समोर येतात ज्या पाहून डोक्यावर हात मारून घ्यावा वाटतो. किंवा त्यातील दृश्य पाहून ही अशी माणसं येतात तरी कुठून? असा प्रश्न पडतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Crocodile Viral Video)

या व्हिडिओमध्ये एका पठ्ठ्यानं जे काही केलंय ते काळजात धडकी भरवणारंच आहे. एक तरुण आपल्या दुचाकीवरून चालला आहे. मात्र तो एकटा नसून त्याच्यासोबत एक भलीमोठी मगर देखील आहे. मगर सीटवर ठेऊन हा महानग त्या मगरीवर बसला आहे. यात त्याच्या चेहऱ्यावर जराही भीती नाही. मस्त आनंदात तो दुचाकीवरून चालला आहे. याच तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video
Shocking Viral Video: अबब! अजगराने गिळली पाच फूटांची मगर, ही दृष्य तुम्हाला विचलीत करू शकतात

हा तरुण मगरीवर बसून दुचाकी चालवत असताना त्याच्या मागे आणखीन एक व्यक्ती दुचाकीवरून जात आहे. त्याने आपल्या मोईलमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. तरुणाला मगरीवर बसून जाताना पाहून रस्त्यावर इतर प्रवाशी अवाक झालेत. oy._.starrr या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ ९ जानेवारीला पोस्ट करण्यात आला आहे. आता पर्यंत या व्हिडिओला ४० लाखांहून अधिक व्यक्तींनी पाहिलं असून २ लाखांपर्यंत याला लाईक्स मिळाले आहेत.

सोशल मीडियावर या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेली मगर जिवंत नसल्याचं समजलं आहे. कारण मगर कोणतीही हालचाल करत नाही. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर विविध कमेंट केल्या आहेत. एकाने ही मगर खोटी असल्याचं देखील म्हटलं आहे. तर एकाने प्राण्यांशी असे वर्तन करणे माणुसकी गमावल्यासारखे असल्याचं म्हटलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com