संसदेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडता येत नसल्याने संभाजीराजे वैतागले

संसदेत सरकार आणि विरोधकांमध्ये होणाऱ्या दररोजच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज वारंवार ठप्प होत आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे.
संसदेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडता येत नसल्याने संभाजीराजे वैतागले
संसदेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडता येत नसल्याने संभाजीराजे वैतागलेSaam Tv News
Published On

नवी दिल्ली : देशाच्या संसदेत सध्या सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये दररोजचे खटके उडत आहे. विविध मुद्द्यांवरुन विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं आहे. दररोज होणाऱ्या प्रचंड विरोधामुळे संसदेत गोंधळ होत असल्याने अध्यक्षांना वारंवार सभा तबकुब करावी लागत आहे. संसदेचे कारण वारंवार ठप्प होत असल्याने अनेक विषयांवर चर्चा होत नाही ज्यात मराठा आरक्षणाचाही विषय आहे. त्यामुळे भाजप खासदार संभाजीराजेंनी यावर नाराजी व्यक्त करत दोन्ही पक्षांनी सामजस्याची भुमिका घेत एकत्र बसुन विषय सोडवावा असं आव्हान ट्विटरद्वारे केलं आहे. (Sambhaji Raje is upset due to obstruction in the work of Parliament)

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे?

''संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. सभापतींनी तीन वेळा प्रश्न मांडण्यासाठी वेळ देखील दिला. मात्र सत्ताधारी व विरोधी पक्षात काही विषयांवर असमन्वय असल्याने त्याचे पडसाद सभागृहात उमटून वारंवार कामकाज स्थगित होत आहे.

हे देखील पहा -

यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही संसदेत मांडता आला नाही. इतरही अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. विरोधकांचा ज्यावर आक्षेप आहे, त्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी सामंजस्याने एकत्र बसून विषय सोडवावेत. मात्र त्याकरिता संसदेच्या कामकाजात बाधा आणू नये.'' असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.

संसदेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडता येत नसल्याने संभाजीराजे वैतागले
पाकिस्तानचा BCCI ला झटका! IPL दरम्यान केले न्युझीलंड सोबतच्या मालिकेचे आयोजन

सरकारला विरोध कशासाठी?

संसदेत सध्या कॉंग्रेससह अन्य विरोधक मिळून सरकारला विविध विषयांवर जाब विचारत आहेत. ज्यात सर्वात मोठा गोंधळ हा पेगॅसस या विषयामुळे होत आहे. पेगॅसस हा ईस्त्राईलच्या कंपनीने बनवलेला स्पायवेयर असून याद्वारे सरकारने सरकारच्या विरोधातील अनेक नेत्यांची हेरगिरी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सोबतच केंद्र सरकारने आणलेले तीन नवे कृषी कायदे, पेट्रोल - डिजेलच्या वाढत्या किंमती, वाढती महागाई, भारत - चीन सीमावाद, कोरोना, अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या अशा कित्येक मुद्द्यांमवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. मात्र सरकार पेगॅसस या अतिसंवेदनशील मुद्दयावर चर्चा करायला तयार नसून उत्तरं देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com