Russia-Ukraine War: रशियाकडून तात्पुरती युद्धबंदी जाहीर केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाण्यासाठी रशियाकडून दोन तासांची युद्धबंदी करण्यात आली आहे. तसेच, युद्धात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे (Russia-Ukraine War Russia declares ceasefire in Ukraine to open humanitarian corridors for civilians).
भारतीय वेळेनुसार आज सकाळी साडे अकरा वाजेपासून हा युद्धविराम जाहीर झाला आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रशियाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. युक्रेनच्या फक्त मारियुपोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांमध्येच युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कीव्ह आणि खारकीव्ह ही दोन शहरं जिथं सर्वाधिक हल्ले सुरु आहेत त्यांचा समावेश नाहीये. युद्धाचा आजचा दहावा दिवस आहे. गेल्या दहा दिवसांपासून या शहरांवर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरु आहेत.
मारियुपोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांमध्ये जो दोन तासांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे तो मुख्यत्वे तिथे जे जखमी आहेत, आजारी आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यास किंवा ते शहर सोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात असल्याची माहितीये. युक्रेनच्या हिशोबाने हा युद्धविराम अत्यंत अल्प आहे. यापुढे रशिया आता कीव्ह आणि खारकीव्ह या शहरांसाठीही असा निर्णय घेणार का याकडे सध्य संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.