Russia-Ukraine War: युक्रेनने तब्बल ६०० दिवस कसा केला रशियाचा सामना, कोणत्या भागांवर पुन्हा मिळवलं नियंत्रण? जाणून घ्या

Russia-Ukraine War: युक्रेन आणि रशियामध्ये तब्बल ६५० दिवसांपासून भयंकर युद्ध सुरू आहे. रशियाच्या तुलनेत युक्रेन खूपच लहान देश असल्यामुळे काही दिवसातच युक्रेन रशियासमोर शरणागती पत्करेल असं मानलं जात होतं.
Russia-Ukraine War
Russia-Ukraine WarSaam Digital
Published On

Russia-Ukraine War

युक्रेन आणि रशियामध्ये तब्बल ६५० दिवसांपासून भयंकर युद्ध सुरू आहे. रशियाच्या तुलनेत युक्रेन खूपच लहान देश असल्यामुळे काही दिवसातच युक्रेन रशियासमोर शरणागती पत्करेल असं मानलं जात होतं. आत्र घडलच उलटच. युक्रेने आजपर्यंत रशियाचा कडवा प्रतिकार केला असून दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. ज्या देशाची अर्थव्यवस्था आणि लष्करी ताकद कितीतरी पटीने कमी आहे, तो देश बलाढ्य रशियापुढे इतके दिवस कसा टिकला असेल?

युद्धात रशियाची बाजू कमकूवत पडू नये यासाठी चीन रशियाला शस्त्रास्त्रे आणि पैसा पुरवत असल्याचा दावा अमेरिका सातत्याने करत आहे. रशियाला पाठिंबा दिल्याबद्दल चीन सरकारशिवाय चिनी कंपन्यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. चीन रशियाला मदत करू अथवा न करू युक्रेनला मदत मिळत असल्याशिवाय इतके दिवस रशिया समोर युद्धात टिकणे अशक्य आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमेरिका आणि युरोपियन युनियनमधील सर्व बडे देश युक्रेनला पैसा आणि शस्त्र पुरवत आहेत. जर्मनीची संशोधन संस्था आयएफडब्ल्यू युक्रेनला कोणता देश किती मदत करतो यावर लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत युक्रेनला २८ देशांनी शस्त्रास्त्रे पुरवली आहेत. यामध्ये अमेरिकेचे सर्वात मोठे योगदान आहे. आयएफडब्ल्यू या संस्थेच्या साइटवर पैसे शस्त्रे, रसद आणि मानवतावादी मदतीचे आकडे उलब्ध आहेत. प्रत्यक्षात मात्र यांचे आकडे सांगणे कठीण असल्याचं या संस्थेने म्हटलं आहे. त्या देशांचा डेटा लीक झाल्याशिवाय त्यात किती पारदर्शकता शोधणे अशक्य आहे.

Russia-Ukraine War
Narayana Murthy : चर्चा तर होणारच! भारतात सर्वाधिक टॅक्स घ्यायला हवा, नारायण मूर्ती पुन्हा बोलले

चिनी कंपन्या क्षेपणास्त्र रडारचे इलेक्ट्ऱॉनिक भाग आणि अनेक लष्करी साहित्य रशियाला पाठवत आहेत. त्यात बुलेटप्रूफ जॅकेटचाही समावेश आहे. उत्तर कोरीया, व्हिएतनाम आणि क्युबाप्रमाणे अमेरिकेवर नाराज असलेले सर्व देश रशियाला मदत करत आहेत, असा दावा सेंटर फॉर अॅडव्हान्स डिफेन्स स्टडीज या अमेरिकन संस्थेने दावा केला आहे.

युक्रेनच्या सुमारे १८ टक्के भागावर सध्या रशियाचे नियंत्रण आहे. पूर्व युक्रेनमधील बाखमुत शहराचा ताबा यांमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे. युक्रेनच्या राजकारणाचे हे केंद्र राहिलं आहे. रशियाने डोनेस्कसह दोन मोठ्या शहरांवरही बऱ्य़ाच अंशी नियंत्रण मिळवलं होतं. लुहान्स्कचा भाग देखील रशियाच्या ताब्यात आहे. दरम्यान २०१४ मध्ये क्रिमियाचा ताबा घेताला होता. युक्रेनमध्ये भयानक विध्वंस होत असूनही रशियाला युक्रेनने तब्बल ६५० दिवस रोखून धरलं आहे. रशियाला युक्रेनमधून हद्दपार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

Russia-Ukraine War
ED Officer Taking 20 lakh Bribe: ई़डीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला २० लाखांची लाच घेताना अटक, दक्षिण भारतातील पहिलीच घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com