Russia Ukraine War : भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रशिया 6 तासांसाठी युद्ध थांबवणार

भारताच्या सांगण्यावरून रशियाने युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarSaam Tv
Published On

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन (russia) युध्द सुरु आहे. अनेक भारतीय युक्रेनच्या कीव शहरात अडकले आहेत. रशियाने युक्रेनच्या कीव, खार्किव आणि प्रमुख औद्योगिक शहरांवर हल्ले सुरु केलेतं. यात कीव शहराचा मोठ्या प्रमाणात नूकसान झालं आहे. युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थीही अडकले आहे. यामुळे पालक चिंतेत आहेत. आता भारतीयांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.

भारताच्या सांगण्यावरून रशियाने युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे. रशियाने खार्किवमधील युद्ध 6 तासांसाठी थांबवण्याचे मान्य केले आहे, जेणेकरून तेथे अडकलेले सर्व भारतीय विद्यार्थी आणि नागरिक तात्काळ तेथून निघू शकतील.

रशियाने (Russia) खार्किवमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या लष्कराकडून मानवी ढाल बनवल्याचा आरोप होत असताना भारतीय जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. खार्किवमधून युक्रेनच्या आसपासच्या देशांच्या सीमेवर अडकलेल्या भारतीय लोकांना बाहेर काढण्यासाठी ६ तासांचा कालावधी देण्यात येत असल्याचे रशियाचे म्हणणे आहे.

युक्रेनच्या खार्किव शहरात अजूनही हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. भारत सरकार त्यांना मायदेशात परतण्यासाठी प्रयत्न करत आहे. एवढेच नाही तर भारतीय वायुसेनेचे C-17 देखील ऑपरेशन गंगामध्ये सामील झाले आहे.

युक्रेनमध्ये भारतीयांना ओलीस ठेवण्यात आले होते आणि त्यांना बाहेर पडू दिले जात नसल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. मात्र, भारतीय दूतावासाने हे वृत्त फेटाळून लावले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाशी केली चर्चा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याचा मुद्दा उपस्थित केला.

रशियाच्या (Russia) राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधानांना सांगितले होते की, रशिया सर्व शक्य ती मदत करण्यास तयार आहे. खार्किवमध्ये युक्रेनचे सैन्य भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे.

याआधी रशियानेही युक्रेनमध्ये ठार झालेल्या नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. रशियानेही संयुक्त राष्ट्रात भारताच्या भूमिकेचे कौतुक केले होते. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताची भूमिका रशियासाठी सकारात्मक असल्याचे रशियाने म्हटले आहे.

पुतिन यांनी दिला विश्वास

भारतीय विद्यार्थ्यांना युद्धक्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना भारतात पाठवण्यासाठी सर्व आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.पीएम मोदींसोबतच्या संभाषणात व्लादिमीर पुतिन यांनी आश्वासन दिले.

Edited by- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com