भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India- TRAI) ने नुकताच आपला नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये सर्व कंपन्यांच्या वायरलेस नेटवर्कची स्पीड आणि मोबाईल ग्राहकांची (Subscribers) संख्या याबद्दलची माहिती दिली आहे. ट्रायनुसार, फेब्रुवारी 2022 मध्ये रिलायन्स जिओने 4G डाउनलोड स्पीड मध्ये बाजी मारली होती, परंतु ग्राहकांच्या बाबतीत, यावेळी जिओलाही फटका बसला आहे. TRAI च्या अहवालानुसार, 36.6 लाख ग्राहकांनी फेब्रुवारी 2022 मध्ये Jio चे नेटवर्क सोडले, तर यामुळे मात्र Airtel ला Jio च्या तुलनेत खूप फायदा झाला आहे.
TRAIच्या आकडेवारीनुसार, जिओने फेब्रुवारीमध्ये Vodafone Idea पेक्षा दुप्पट अधिक ग्राहक गमावले – तर Vodafone Idea ने 1.5 दशलक्ष ग्राहक गमावले, तर Jio ने जवळपास 3.7 दशलक्ष ग्राहक गमावले. (Reliance Jio lost Subscribers News Updates)
जीओ आणि वोडाफोनला मोठं नुकसान;
ट्रायच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये टेलिकॉम ग्राहकांची संख्या कमी होऊन 116.60 करोड झाली आहे. या अवधीत जिओ आणि वोडाफोन --आयडिया (VI) ला मोठे नुकसान झाले आहे. फेब्रुवारीमध्ये टेलिकॉम ग्राहकांची संख्या 116.60 करोड होती तीच जानेवारीच्या शेवटी 116.94 करोड होती. फेब्रुवारीमध्ये रिलायन्स जिओ ला नुकसान झाले आहे. फेब्रुवारीमध्ये जिओच्या ग्राहकांची संख्या 40.27 दशलक्ष होती, जी जानेवारीच्या तुलनेत 36.6 लाख कमी आहे. तसेच सप्टेंबर 2021 पासूनच्या सहा महिन्यांत, रिलायन्स जिओने लाखो ग्राहक गमावले आहेत. व्होडाफोन आयडियानेही या महिन्यांत ग्राहक गमावले असले तरी, त्याचे नुकसान दरमहा सरासरी 1.2 दशलक्ष इतके होते.
हे देखील पहा-
अरटेलने जोडले 15.91 लाख नवीन ग्राहक;
ज्यावेळी सर्व टेलिकॉम कंपन्यांना मोठे नुकसान होत होते मात्र त्याचवेळी फेब्रुवारी 2022 मध्ये एरटेल अशी टेलिकॉम कंपनी राहिली की ज्या कंपनीला चांगलाच फायदा झाला आहे. फेब्रुवारीमद्ये एरटेलने 15.91 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. यामुळे ग्राहकांची संख्या 35.80 करोड एवढी झाली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.