Russia-Ukraine War: आत्मसमर्पण करण्यास नकार, रशियन सैन्यांकडून युक्रेनच्या 13 सैनिकांची हत्या, पाहा व्हिडीओ

'तुम्ही शस्त्रे खाली ठेवा आणि शरणागती पत्करा, अन्यथा तुमच्यावर हल्ला केला जाईल'; रशियन सैनिकांच्या (Russian Soldiers) या आव्हानाला युक्रेनच्या सैन्यांने जुमानलं नाही.
Russia-Ukraine War
Russia-Ukraine WarSaam TV
Published On

वृत्तसंस्था : रशिया युक्रेनदरम्यान (Russia Ukraine) गेल्या काही आठवड्य़ांपासून सुरु असलेल्या संघर्षाचे रुपांतर काल गुरुवारपासून अखेर युद्धात झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी गुरुवारी युक्रेनवर हल्ला करत युद्ध घोषित केले, यानंतर युक्रेननेही रशियाविरुद्ध युद्ध घोषित केले असून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी देशभरात सैन्य तैनात करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. यासोबतच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि नाटो देशांवरही निशाणा साधला असून रशियासोबतच्या लढाईत आपण एकाकी पडलो, असे म्हटले आहे.

दरम्यान याच युद्धतांडवामध्ये रशियन युद्धनौकेवरील सैनिकांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्याने 13 युक्रेनियन सैनिकांची हत्या केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रशियन युद्धनौकेवरून असे म्हटले जात आहे की, 'तुम्ही शस्त्रे खाली ठेवा आणि शरणागती पत्करा, अन्यथा तुमच्यावर हल्ला केला जाईल. मात्र रशियन सैनिकांच्या (Russian Soldiers) या आव्हानाला न जुमानता उलट रशियन युद्धनौका नरकात जातील असं युक्रेनियन पोस्टवरून म्हटलं आणि याचा राग आल्याने रशियन सैनिकांनी बेटावर असणारे 13 सैनिक मारले.

पहा व्हिडीओ -

रशियाने कीव्हवर रॉकेटने हल्ला केला -

रशियाने कीव्हवर रॉकेटने हल्ला केल्याचा युक्रेनचा दावा आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी या हल्ल्याची माहिती देताना पुतिन यांना थांबवा आणि रशियाला एकटे पाडा, असे सांगितले. रशियाला सर्व ठिकाणांहून बाहेर काढा, रशिया सतत युक्रेनची राजधानी कीव्ह जवळून फिरत आहे. कीव्हमधील मेट्रो स्टेशन लोकांसाठी बॉम्ब आश्रयस्थान बनले असून रशियन हल्ल्यानंतर कीव्हमधील जवळपास प्रत्येक स्टेशनवर मोठ्या संख्येने लोकांनी आश्रय घेतला आहे.

युक्रेनचा दावा 800 रशियन सैनिक मारले

800 हून अधिक रशियन सैनिक मारल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराने रकेला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com