Arvind Kejriwal: दिल्लीत मी भाजपचा प्रचार करणार, असं का म्हणाले अरविंद केजरीवाल? वाचा...

Arvind Kejriwal On BJP : तर मी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र यांचा प्रचार करणार, असं दिल्लीचे माझी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल का म्हणाले, जाणून घ्या....
दिल्लीत मी भाजपचा प्रचार करणार, असं का म्हणाले अरविंद केजरीवाल? वाचा...
Arvind Kejriwal and Pm ModiSaam Tv
Published On

आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर आयोजित केलेल्या दुसऱ्या 'जनता की अदालत'मध्ये पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. केजरीवाल म्हणाले की, डबल इंजिन सरकार म्हणजे डबल लूट, डबल भ्रष्टाचार आणि बेरोजगारी. ते म्हणाले की, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील भाजपच्या डबल इंजिन सरकारचा अंत होत आहे.

या कार्यक्रमात केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्ली निवडणुकीआधी एनडीए शासित 22 राज्यांमध्ये मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे आव्हान केलं आणि त्यांनी तसे केल्यास ते भाजपचा प्रचार करतील, असं ते म्हणाले. अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजप गरीब विरोधी आहे, त्यांनी दिल्लीतील बस मार्शल, डेटा एन्ट्री ऑपरेटर हटवले आणि होमगार्डचे पगार थांबवले.

दिल्लीत मी भाजपचा प्रचार करणार, असं का म्हणाले अरविंद केजरीवाल? वाचा...
Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

छत्रसाल स्टेडियमवर 'जनता की अदालत'ला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, "भाजपची 22 राज्यांमध्ये सरकारे आहेत, तुम्ही त्यांना सांगा की त्यांनी एक राज्य सांगावे, जिथे त्यांनी वीज मोफत दिली आहे. ते गुजरातमध्ये 30 वर्षांपासून सत्तेत आहेत. या 22 राज्यांमध्ये सरकारने एकही चांगले काम केले नाही आणि मी तुम्हाला असे आव्हान देतो की, 22 राज्यांमध्ये वर्षभरात काही कामे करून दाखवा, त्यांनी 10 वर्षांत काहीही केले नाही, मग तुम्ही निवृत्त झाल्यावर सर्वजण विचार करतील.''

ते म्हणाले, ''तुम्ही (भाजप) 10 वर्षात काहीही केले नाही. आज मी पंतप्रधान मोदींना सांगतो की, दिल्लीच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये आहेत, या 22 राज्यांमध्ये वीज मोफत करा आणि मी दिल्लीच्या निवडणुकीत मोदींचा प्रचार करेन.''

दिल्लीत मी भाजपचा प्रचार करणार, असं का म्हणाले अरविंद केजरीवाल? वाचा...
Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, ''दिल्लीत निवडणुका येतील, डबल इंजिन सरकारची मागणी करतील. तुम्ही हरियाणाबद्दल विचारले पाहिजे, त्यांनी असे काय केले आहे की लोक त्यांच्या नेत्यांना त्यांच्या गावात येऊ देत नाहीत. गेल्या 7 वर्षांपासून यूपीमध्ये डबल इंजिनचे सरकार आहे, लोकसभा निवडणुकीत त्यांच्या जागा निम्म्या झाल्या आहेत. मणिपूरमध्येही डबल इंजिनचे सरकार आहे, ते जळत आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com