रक्षाबंधन, गणेशोत्सवाला बाहेर जायचा प्लॅन करताय; तर वाचा हे नियम...

कोरोनाचे निर्बंध हळुवारपणे शिथिल होत असले, तरी राज्याने आणि प्रशासनाने काही नियम कायम ठेवले आहेत.
रक्षाबंधन, गणेशोत्सवाला बाहेर जायचा प्लॅन करताय; तर वाचा हे नियम...
रक्षाबंधन, गणेशोत्सवाला बाहेर जायचा प्लॅन करताय; तर वाचा हे नियम...Saam Tv
Published On

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची Coronavirus तिसरी लाट कधीही येऊ शकणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात आता रक्षाबंधन Rakshabandhan आणि गणेशोत्सव Ganeshotsav असे विविध सण- उत्सव जवळच आले आहेत. सण- उत्सव साजरा करण्याकरिता खुपजण हे आपल्या मूळगावी जात असतात. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या राज्यांनी आपल्या राज्यांत इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोणत्या प्रकारची नियमावली निश्चित केली आहे.

काही राज्यांत प्रवेश करण्यासाठी आरटी- पीसीआर RTPCR चाचणीचा निगेटिव्ह Negative असल्याचे रिपोर्ट आवश्यक राहणार आहेत, तर काही राज्यांत प्रवेश करताना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली असल्याचे प्रमाणपत्र Certificate गरजेचे राहणार आहे. चला तर मग, कोणत्या राज्यामध्ये प्रवेश करताना आरटी- पीसीआर चाचणी रिपोर्ट ही आवश्यक राहणार आहे, आणि कोणत्या राज्यामध्ये लसीकरण प्रमाणपत्र लागणार आहे, हे जाणून घेऊया.

हे देखील पहा-

छत्तीसगडमध्ये Chhattisgarh विमानाने येणाऱ्या प्रवाशांनी विमान प्रवास सुरू करण्याच्या वेळेअगोदर ९६ तासांच्या अगोदर केलेल्या आरटी- पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. छत्तीसगड सरकारने याबद्दल मंगळवारी असा निर्णय जाहीर केला आहे. कर्नाटक Karnataka सरकारने केरळ आणि महाराष्ट्र या ठिकाणाहून राज्यामध्ये येणाऱ्या नागरिकांना आरटी- पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने हिमाचल प्रदेश Himachal Pradesh सरकारने राज्यात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना आरटी- पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य केला आहे. हा रिपोर्ट ७२ तासांअगोदरचा असावे लागणार आहे. आणि कोरोना लसीचे १ किंवा २ डोस घेतले असतील, तर लसीकरण प्रमाणपत्र घेऊन हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला प्रवेश करता येईल.

ऑगस्टपासून केरळ मधील तामिळनाडूत येणाऱ्यांना सर्वांना आरटी- पीसीआर चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट सोबत असेल तर चेन्नईला जाता येणार आहे. राज्यात कोणतेही वाहन विमान, रेल्वे, बस, खासगी वाहन इत्यादीना प्रवेश करायचा असेल तर आरटी- पीसीआर चाचणीचा रिपोर्ट हा निगेटिव्ह राहणे बंधनकारक राहणार आहे. केरळ राज्यामधून गोव्यात येणाऱ्या प्रवाशांकरिता आरटी- पीसीआर चाचणीचा रिपोर्ट हा अतिशय महत्त्वाचा करण्यात आला आहे.

रक्षाबंधन, गणेशोत्सवाला बाहेर जायचा प्लॅन करताय; तर वाचा हे नियम...
SPECIAL REPORT | मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर व्यापारी नाराज ; पाहा हा स्पेसिअल रिपोर्ट,पाहा व्हिडिओ

पुणे, मुंबई आणि चेन्नई या ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी पश्चिम बंगालच्या सरकारने आरटी- पीसीआर चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे अनिवार्य केले आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, चंदीगड आणि हरियाणा राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही.

कोरोना लसीचा १ डोस घेतलेल्या प्रवाशांना राज्यस्थान आणि नागालँड राज्यात कोरोना चाचणी निगेटिव्ह रिपोर्टची आवश्यकता राहणार नाही. कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्या व्यक्तीला छत्तीसगड, मणिपूर, ओडिशा, त्रिपुरा, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि मेघालयात प्रवेश करत असताना कोरोना निगेटिव्ह रिपोर्टची आवश्यकता यापुढे राहणार नाही.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com