रायपूरमध्ये मोठी दुर्घटना, हेलिकॉप्टर क्रॅश होऊन 2 पायलटचा मृत्यू!

शासकीय हेलिकॉप्टर ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरचा अपघात झाला
Raipur Helicopter Crash
Raipur Helicopter Crash Saam Tv

छत्तीसगड: छत्तीसगडमधील रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर काल रात्री शासकीय हेलिकॉप्टर (Helicopter) ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. विमानतळावर झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये २ वैमानिकांचा (pilots) मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री (CM) भूपेश बघेल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा धक्कादायक अपघात (Accident) झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. लँडिंग करत असताना हेलिकॉप्टरचे पंखे जमिनीवर टेकले, यामुळे हेलिकॉप्टरचा (Helicopter) समतोल बिघडला होता. खाली पडल्यावर हेलिकॉप्टरचा जागेवरच चक्काचूर झाला आहे.

हे देखील पाहा-

या अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य करण्यासाठी पथक घटनास्थळी रवाना झाले होते. रात्रभर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. विमानतळावर हेलिकॉप्टर अपघात झाला असल्यामुळे नियमित उड्डाणावर कोणताही परिणाम होणार नाही. सर्व उड्डाणे सामान्य असणार आहे, असे विमानतळ संचालकांनी सांगितले आहे. राज्य सरकारचे (State Government) हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. रायपूर (Raipur) विमानतळावर रात्री ९.१० वाजता हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस (Police) आणि प्रशासनाचे उच्च अधिकारी विमानतळावर पोहोचले होते. तेथे त्यांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत अपघाताच्या कारणाची माहिती घेतली आहे.

Raipur Helicopter Crash
पाकिस्तानातील कराचीमध्ये बॉम्बस्फोट, 3 ठार, 13 जण जखमी

रायपूरचे एसएसपी प्रशांत अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचे २ पायलट कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा आणि कॅप्टन एपी श्रीवास्तव हे उड्डाणाचा सराव करत होते. यावेळी अचानक हा अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही वैमानिकांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. कॅप्टन पांडा मूळचा ओडिशाचा आहे. गेल्या काही वर्षांपासून ते राज्य सरकारमध्ये वरिष्ठ पायलट म्हणून कार्यरत होते. कॅप्टन श्रीवास्तव हे दिल्लीचे रहिवासी होते. बचाव पथकाने दोघांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मात्र, गंभीर जखमी झालेल्या दोन्ही कॅप्टनना रुग्णालयात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी अपघाताची माहिती मिळाल्यावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, रायपूर विमानतळावर राज्य हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची दुःखद माहिती मिळाली. या दुःखद अपघातात आमचे दोन्ही पायलट कॅप्टन पांडा आणि कॅप्टन श्रीवास्तव यांचे दुःखद निधन झाले आहे. या दुःखाच्या प्रसंगी देव त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती देवो आणि त्यांच्या आत्म्याला शांती देवो. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com