

Railway Ticket Rules: भारतात प्रवासासाठी खिशाला परवडणारी आणि सोयिस्कर असलेली वाहतूक सेवा म्हणजे रेल्वे. भारतात कोट्यावधी लोक रेल्वे ट्रेनने प्रवास करतात. कारण रेल्वे प्रवासात कमी वेळात मोठं अंतर कापता येतं. तसेच कमी खर्चात वाहतूक करता येते. त्यामुळे प्रत्येक सामान्य माणूस लोकल ट्रेनचा वापर करतात. अशात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला रेल्वेच्या काही नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. (Latest Marathi News)
ट्रेन सुटल्यावर काय करावे?
अनेक वेळा व्यक्ती ट्रेनने लाबंचा प्रवास करतात तेव्हा त्यांची ट्रेन सुटते. ट्रेन सुटल्यावर आता काय करावे असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहतो. अशा वेळी माहिती नसल्याने काही जण पुन्हा घरी जातात. मात्र तुम्ही तिकिट काढलेले असताना अन्य ट्रेनमधून प्रवास करु शकता. तुम्ही दोन स्टेशननंतर पुन्हा आपली ट्रेन पकडून प्रवासाला सुरुवात करु शकता.
जेव्हा तुमची ट्रेन सुटते तेव्हा तुमचे सीट टीसी लगेचच इतर प्रवाशाला देत नाही. दोन स्थानकांपर्यंत ते आपली वाट पाहतात. मात्र २ स्थानक उलटून प्रवाशी आला नसल्यास त्या जागी इतर प्रवाशास बसण्याची परवाणगी दिली जाते.
नाशिकच्या तिकीटावर औरंगाबादचाही प्रवास करू शकता
रेव्लेच्या नियमांमध्ये असाही एक नियम आहे ज्यामध्ये तुम्ही एकाच तिकीटावर दुसऱ्या ट्रेनमधूनही प्रवास करु शकता. अनेकवेळा व्यक्ती बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. मात्र काही कारणांमुळे त्यांचा प्लॅन फसतो. किंवा अन्य दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा ते निर्णय घेतात. तर अशावेळी तुम्ही ज्या ठिकाणचे तिकीट काढले आहे ते परत न करता त्याच तिकीटावर दुसऱ्या ठिकाणची ट्रेन पकडू शकता.
कोणताही दंड भरावा लागणार नाही
जेव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रवास करता तेव्हा दंड भरावा लागेल अशी शंका अनेकांच्या मनात असते. मात्र तसे नसून तुम्ही दुसऱ्या तिकीटावर सुद्धा प्रवास करु शकता. यासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही.
या व्यतीरीक्त काही लक्झरी ट्रेनसाठी देखील नियम लावण्यात आले आहेत. यामध्ये जर तुम्ही ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर प्रवास करत असाल तर तुम्ही मध्ये काही वेळ ब्रेक घेऊ शकता. जर प्रवास १००० किलोमीटरचा असेल तर तुम्ही २ ब्रेक घेऊ शकता. विशेष म्हणजे रुट ब्रेक जर्नी मार्फत तुम्ही प्रवासाचा दिवस वळता आणखीन २ दिवसांचा ब्रेक घेऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.