Rahul Gandhi: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे ४० पोस्टर फाडले; कर्नाटकात भलतंच राजकारण

गुंडलपेट परिसरात काँग्रेसचे पोस्टर फाडण्यात आले आहेत. भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी हे पोस्टर शहरभर लावण्यात आले होते.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Saam TV
Published On

बंगळुरु : कर्नाटकात काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा सुरु होण्याआधीच पोस्टर फाडण्याचा प्रकार समोर आला आहे. उद्यापासून भारत जोडा यात्रा केरळमधून कर्नाटकात प्रवेश करणार आहे. त्याआधी कर्नाटकात राहुल गांधी (Rahul Gandhi), माजी मुख्यमंंत्री सिद्धरमैया यांच्यासह कर्नाटकातील इतर मोठ्या नेत्यांची पोस्टर शहरात लावण्यात आले आहेत. मात्र यापैकी जवळपास चाळीत पोस्टर फाडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Rahul Gandhi
महिलेची इच्छा नसताना पतीने स्पर्श केला तरी तो गुन्हाच; 'मॅरिटल रेप'वर SCचा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, गुंडलपेट परिसरात काँग्रेसचे पोस्टर फाडण्यात आले आहेत. भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी हे पोस्टर शहरभर लावण्यात आले होते. पोस्टर कुणी फाडले याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र भाजपकडून हे पोस्टर फाडण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. केरळमधील 7 सप्टेंबरला सुरु झालेल्या या यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. (Latest Marathi News)

Rahul Gandhi Posters
Rahul Gandhi PostersSaam Tv

भारत जोडो यात्रेचं कर्नाटकातील महत्त्व

कर्नाटकात काँग्रेस आणि भाजप असा थेट सामना निवडणुकीत पाहायला मिळतो. सध्या कर्नाटकात भाजपची सत्ता आहे. पुढच्या वर्षी कर्नाटकता विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेस कर्नाटकात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी महत्त्वाची आहे.

कर्नाटकातील दोन मोठ्या नेत्यांमधील मतभेद समोर येत आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरमैया आणि डी शिवकुमार यांच्यामधील मतभेद आता लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील दुरावा कमी करण्यासाठी ही यात्रा काही मदत करु शकते का हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com