जगातील इतर काही देशांप्रमाणे बांगलादेशातही (Bangladesh) अद्याप कोरोनाचा (Corona virus) कहर कायम आहे. मात्र, देशात बांगलादेशातील एका शेतात एका गायीला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता तुम्ही म्हणाल गायीला पाहण्यासाठी गर्दी करायची गरज काय, मात्र या गाईची खासियतच अशी आहे. कारण या गायीची ऊंची फक्त 20 इंच (20 inch) म्हणजे 51 सेंटिमीटर (51 cm) आहे आणि वजन आहे अवघं 28 किलो. या चिमुकल्या गायीच नाव आहे राणी (Rani) आणि ती फक्त 23 महिन्यांची आहे. विशेष म्हणजे राणी जगातील सर्वात छोटी गाय असल्याचा दावा केला आहे. राणी सध्या बांगलादेशात आकर्षणाचे केंद्र बनली आहे. (Queen: The world's shortest cow)
बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहराजवळील छारीग्रामजवळ शिकोर अॅग्रो फार्म' मध्ये राणीला ठेवण्यात आलं आहे. बांगलादेशात कोव्हिडमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला असतानाही आतापर्यंत जवळपास 15 हजार जणांनी राणीला पाहण्यासाठी या शेतात भेट दिली आहे. बांगलादेशाच्या वायव्येकडील नावगाव परिसरातल्या एका शेतामधून शेताचे व्यवस्थापक हसन हवालदार यांनी राणील आपल्या शेतात आणले होते. आता त्यांनी जगातली सर्वांत लहान गाय म्हणून राणी गायीची 'गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद करण्यासाठी अर्ज केला आहे.
"मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये इतकी लहान गाय पहिली नव्हती. असे म्हणत राणीला पाहण्यासाठी आलेल्या एक महीलेने तिला पाहिल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. हसन हवालदार यांनी दिलेलया माहितीनुसार, राणी दिवसातून फक्त दोन वेळा थोडा-थोडा कोंडा आणि गवत खाते. राणीला चालण्यात अडथळे येत असून ती इतर गायींना पाहिल्यावर घाबरते. त्यामुळं 'शिकोर अॅग्रो फार्म'मध्ये तिला इतर गायी आणि प्राण्यांपासून वेगळं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र रणीला बाहेर फिरायला आवडतं आणि तिला उचलून घेतल्यावर तिला प्रचंड आनंद होतो," असंही हवालदार यांच म्हणणं आहे.
आता जगातील सर्वांत कमी उंचीची गायी म्हणून राणीची 'गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये नोंद होण्यासाठी संबंधित अधिकारी शिकोर अॅग्रो फार्मला यावर्षी भेट देण्याची शक्यता असल्याचेही हवालदार यांनी म्हटले आहे.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.