Punjab University: मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनिंना मिळणार सुट्टी, देशातल्या नामांकित विद्यापिठाने घेतला मोठा निर्णय

Menstrual Leave During Periods: चंदीगडमधील पंजाब युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. युनिव्हर्सिटीने मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना सुट्टी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब युनिव्हर्सिटीच्या या निर्णयाचे विद्यार्थिनिंनी स्वागत केले आहे.
College Girls
College GirlsSaam Tv

मासिक पाळीदरम्यान (Menstruation Period) अनेक मुली आणि महिलांना प्रचंड त्रास होतो. या काळामध्ये आरामाची गरज असते. या काळात शाळा, कॉलेज आणि जॉबला सुट्टी मिळावी असे अनेकांना वाटते. अशामध्ये चंदीगडमधील पंजाब युनिव्हर्सिटीच्या (Punjab University) विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. युनिव्हर्सिटीने मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना सुट्टी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब युनिव्हर्सिटीच्या या निर्णयाचे विद्यार्थिनिंनी स्वागत केले आहे.

पंजाबमध्ये हे पहिल्यांदा होत आहे जेव्हा एखादी युनिव्हर्सिटीने Menstrual Leave साठी पुढाकार घेतला आहे. याबाबतची माहिती देणारे परिपत्रक युनिव्हर्सिटीद्वारे जारी केले असले तरी युनिव्हर्सिटीने याबाबत काही अटी देखील घातल्या आहेत. पंजाब युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंनी सांगितले की, 'आगामी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून विद्यार्थिनींना अटी व शर्थीसह सुट्टी दिली जाईल. पण ही सुट्टी फक्त एका दिवसासाठी दिली जाईल. सुट्टी घेण्यासाठी विद्यार्थिनींना आधी विभागीय कार्यालयात उपलब्ध असलेला फॉर्म भरावा लागेल. फॉर्म दाखल केल्यानंतर विद्यार्थिनीला सुट्टीसाठी परवानगी मिळेल.

College Girls
Indian Army Recruitment 2024: भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्याचे स्वप्न होणार पूर्ण, लवकर करा अर्ज; मिळेल 2 लाखांपेक्षा जास्त पगार

म्हणजे पंजाब युनिव्हर्सिटीत शिकणारी विद्यार्थिनी कॅलेंडरनुसार मासिक पाळी आल्यास एका महिन्यात एक दिवसाच्या सुट्टीसाठी अर्ज करू शकते. विद्यार्थिनी किमान १५ दिवस कॉलेजमध्ये आलेली असेल या अटीवरच ही सुट्टी दिली जाईल. नियमानुसार प्रत्येक सेमिस्टरला ४ दिवस सुट्टी दिली जाईल. त्याचसोबत मासिक पाळीसाठी सुट्टी फक्त सामान्य दिवसात दिली जाईल. विद्यार्थिनींना परिक्षेदरम्यान सुट्टीसाठी अर्ज करता येणार नाही, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

College Girls
Rameshwaram Cafe Blast Case : बेंगळुरुतील रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी मोठी अपडेट; 'एनआयए'ने आवळल्या दोघांच्या मुसक्या

मासिक पाळीदरम्यान सुट्टीसाठीची परवानगी युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष किंवा संचालकांकडून दिली जाईल. विद्यार्थिनींना स्व-प्रमाणपत्राच्या आधारे रजा दिली जाईल. विद्यार्थिनींना कामकाजाच्या ५ दिवसांच्या आत सुट्टीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. यानंतर विद्यार्थिनींच्या सुट्ट्या आणि हजेरी तपासल्या जातील. सट्टी ठराविक महिन्यातील फक्त एका दिवसासाठी दिली जाईल. सुट्टी कोणत्याही कारणास्तव वाढवण्यात येणार नाही, असे देखील सांगण्यात आले आहे. दरम्यान, केरळमधील कोचिन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे देशातील पहिले विद्यापीठ आहे ज्यांनी जानेवारी २०२३ मध्ये मासिक पाळीदरम्यान सुट्टी सुरू केली. तसंच, आसामचे गुवाहाटी विद्यापीठ, NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद आणि आसामचे तेजपूर विद्यापीठ देखील मासिक पाळीदरम्यान सुट्टी देतात.

College Girls
Pakistani Army Attack: पाकिस्तानी सैन्याचा पंजाब पोलीस ठाण्यावर हल्ला, बेदम मारहाणीचा VIDEO समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com