काबुल मध्ये झालेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा यंत्रणा अतिसतर्क झाल्या असून पाकिस्तानकडून भारतात देखील अश्याच पद्धतीचा स्फोट घडवून आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुप्तचर यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार दहशतवादी देशातील जवानांना आपलं लक्ष्य बनवू शकतात.
हे देखील पहा -
तालिबानने अफगाणिस्तानात सत्तेचा ताबा घेतल्यानंतर पाकिस्तान तालिबानच्या साहाय्याने भारताला उपद्रव करण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानातून जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammad) या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून भारतात दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट पाकिस्तान रचत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे काही दहशतवादी PoK मार्गाने जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करू शकतात. त्यामुळे, या सर्व पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.