कर्नाटकातही भोंग्यावरुन राजकारण तापलं; भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा

उत्तर प्रदेश, महाराष्ट्रनंतर आता कर्नाटकातही भोंग्यावरुन राजकारण तापलं आहे.
Loudspeaker Controversy
Loudspeaker ControversySaam Tv

बंगळुरू: भोंग्याविरुध्दचा वाद आता कर्नाटकातही (Karnataka) सुरु झाला आहे. आता कर्नाटकातील हिंदू संघटनांनी राज्यभरात मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. भोंगे जिथे लागतील तिथे हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत राज्यात पोलीस (Police) सतर्क आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात कोणतीही हयगय केली जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.

श्री राम सेना नावाच्या संघटनेचे संस्थापक प्रमोद मुथालिक यांनी सोमवारी म्हैसूर जिल्ह्यातील एका मंदिरात आयोजित कार्यक्रमात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) मोहिमेची सुरुवात केली. 'सुमारे १००० मंदिरांमध्ये 'गुड मॉर्निंग' पूजा आणि हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले, अशी माहिती प्रमोद मुथालिक यांनी दिली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि गृहमंत्री अर्ग ज्ञानेंद्र यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे धैर्य दाखवावे आणि धार्मिक स्थळांमधील बेकायदेशीर लाऊडस्पीकर (Loudspeaker) आणि इतर ठिकाणचे लाऊडस्पीकर काढून टाकण्यात यावेत अशी मागणी केली.

Loudspeaker Controversy
नाशिकचे मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

याबाबत पोलिसांनी (Police) कारवाई सुरु केली आहे. बंगळुरूमधील एका मंदिरातही ही मोहीम राबविणाऱ्या येणार होती. पोलिसांनी यातील काही लोकांना ताब्यात घेतले आहे. जातीय हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी (Police)राज्यात अलर्ट जारी केला आहे.

ध्वनिक्षेपका संदर्भात कोर्टाने दिलेल्या आदेशाचे कोणी पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जे कोणी कायदा हातात घेतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं कर्नाटकचे गृहमंत्री अर्ग ज्ञानेंद्र म्हणाले.

लाऊडस्पीकरबाबत (Loudspeaker) ३०१ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात मंदिरे, चर्च, मशिदी, उद्योग, बार आणि रेस्टॉरंटचाही समावेश आहे. प्रमोद मुथालिक यांनी सरकार बेकायदा लाऊडस्पीकरवर कारवाई करत नसल्याचा आरोप केला आहे.

हे देखील पाहा

महाराष्ट्रातही भोंग्यावरुन राजकारण तापलं आहे. मनसेच्या (MNS) गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यावरुन राज्य सरकारला इशारा दिला. ४ मे दिवशी मनसेने राज्यात आंदोलन केलं होतं. पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com