नाशिकचे मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

४ मेपासून अंकुश पवार फरार झाले होते.
Ankush Pawar Arrested
Ankush Pawar ArrestedSaam Tv

नाशिक : नाशिक मनसेचे (MNS) जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार यांना भद्रकाली पोलिसांनी (Police) अटक केली आहे. पवार यांना त्रंबकरोड येथून अटक केली आहे. ४ मे रोजी मनसेने राज्यात भोंग्याविरोधात आंदोलन केले होते. तेव्हापासून अंकुश पवार (Ankush Pawar) फरार झाले होते. पवार यांच्यासह दोघांना ताब्यात घेतलं आहे.

गुढी पाडवा मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात राज्य सरकारले इशारा दिला होता. तेव्हापासूनच राज्यातील राजकारण तापले होते. ज्या ठिकाणी भोंगा वाजेल त्यासमोर स्पीकरवरुन हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा दिला होता.

४ मे दिवशी मनसेने भोंग्याविरोधात राज्यात आंदोलन सुरु केले होते. यावळी राज्यभरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुंबईत शिवसेने नेते संदिप देशपांडे यांनाही पोलिसांना (Police) ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. ४ मे दिवशीही पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.  

या आंदोलनानंतर अंकुश पवारही फरार होते. आज नाशिक पोलिसांनी त्रंबक रोड येथून ताब्यात घेतले. काल मनसे शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांना हद्दपार केले आहे. आणि आज नाशिकच्या जिल्हाध्यक्षांना ताब्यात घेतले आहे. नाशिक पोलिसांनी मनसे (MNS) च्या पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास आता सुरुवात केली आहे.

भोंग्यावरुन मागिल काही दिवसापासून राजकारण तापले आहे. यापार्श्वभूमीवर आता राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. यावरुन उत्तर प्रदेशमध्ये राज ठाकरेंना विरोध सुरु झाला आहे. राज ठाकरे यांनी अगोदर उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागावी नंतरच त्यांना अयोध्येत येवू द्यावे अशी मागणी केली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com