Pneumonia In Pakistan: प्रचंड थंडी, धुके... पाकिस्तानमध्ये निमोनियाचा कहर, जानेवारीमध्ये मुलांच्या मृत्यूचा आकडा वाढला

Pneumonia In Pakistan News: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात निमोनियाने कहर केला आहे. कडाक्याच्या थंडीत हा आजार जीवघेणा ठरत असून जानेवारी महिन्यात निमोनियामुळे आतापर्यंत 244 जणांचा मृत्यू झाला आहे.
Pneumonia In Pakistan
Pneumonia In PakistanSaam Digital
Published On

Pneumonia In Pakistan

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात निमोनियाने कहर केला आहे. कडाक्याच्या थंडीत हा आजार जीवघेणा ठरत असून जानेवारी महिन्यात निमोनियामुळे आतापर्यंत 244 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये गेल्या २४ तासांत आणखी सात तरुणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण पंजाब प्रांतात २४ तासांत निमोनियाची ९४२ नवीन प्रकरणे नोंद झाली आहेत, त्यापैकी २१२ नवीन लाहोरमधील आहेत, अशी माहिती पंजाब आरोग्य विभागाने दिली आहे.

या महिन्यात पंजाबमध्ये 244 मृत्यूंपैकी 50 एकट्या लाहोरमध्ये आहेत. आरोग्य अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हिवाळ्यात धुक्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. तसेच थंडीच्या महिन्यात निमोनियाचे प्रमाण वाढत असल्याचं म्हटलं आहे.

सर्दी आणि फ्लूमुळे निमोनिया

वास्तविक निमोनिया हा फुफ्फुसाचा आजार आहे जो सामान्यतः विषाणूंमुळे होतो. सर्दी आणि फ्लूमुळे निमोनिया होतो, जो कधीकधी प्राणघातक ठरतो. हा आजार मुलांमध्ये अधिक पसरतो. पाच वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना निमोनिया जास्त त्रास होतो.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pneumonia In Pakistan
Mexico International Airport: फ्लाइट टेक ऑफ होणारच होती..इतक्यात इमर्जन्सी गेट उघडून प्रवासी आला बाहेर अन् केलं भयंकर कृत्य

बहुतेक मुलांना निमोनियाची लस देण्यात आली नव्हती

धक्कादायक म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या बहुतेक मुलांना निमोनियाची लस देण्यात आलेली नव्हती. मुले कुपोषित होती त्यामुळे त्यांच्यात विषाणूशी लढण्याची क्षमता नव्हती. परिस्थितीचे गांभीर्य पाहून सरकार पूर्ण अलर्ट मोडवर आले आहे. सरकारने संपूर्ण पंजाब प्रांतातील शाळांमध्ये ३१ जानेवारीपर्यंत सकाळच्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.

निमोनियाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न

पंजाबचे आरोग्य अधिकारी निमोनियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी लोकांना सातत्याने जागरूक केले जात असून इतर महत्त्वाच्या उपाययोजनांवरही भर दिला जात आहे. लोकांना सतर्क राहून खबरदारी घेण्यास सांगण्यात येत आहे.

Pneumonia In Pakistan
World Richest Person : जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर; एलॉन मस्क यांना मागे टाकत बर्नार्ड अर्नॉल्ट अव्वल स्थानी; नेमकं काय झालं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com