Jharkhand Floor Test : हेमंत सोरेन फ्लोर टेस्टमध्ये सहभागी होणार का? न्यायालयाने काय दिला आदेश? जाणून घ्या

Jharkhand News: झारखंडमधील राजकीय संकट अजूनही संपलेलं नाही. चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र त्यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान हे बहुमत सिद्ध करण्याचे.
Hemant Soren
Hemant Soren Saam Tv
Published On

Hemant Soren News:

झारखंडमधील राजकीय संकट अजूनही संपलेलं नाही. चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र त्यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान हे बहुमत सिद्ध करण्याचे. जेएमएमचे आमदार हैदराबादला हलवण्यात आले आहेत.

त्यांच्यासोबत काही काँग्रेसचे आमदारही आहेत. असं असूनही बहुमताचा आकडा पूर्ण होताना दिसत नाही. हेमंत सोरेनही फ्लोर टेस्टमध्ये सहभागी होणार का? याबाबत न्यायालयाने आपला आदेश सुनावला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hemant Soren
Lal Krishna Advani: भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी झाले भावुक, म्हणाले...

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना शुक्रवारी एकाच दिवसात दोन धक्के बसले आहेत. मात्र आज त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. फ्लोर टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करत पीएमएलए न्यायालयाने शनिवारी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना फ्लोर टेस्टमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली. (Latest Marathi News)

दरम्यान, हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 31 जानेवारी रोजी जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. यानंतर त्यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. एका दिवसानंतर पीएमएलए कोर्टाने शुक्रवारी आपला आदेश दिला आणि त्यांना 5 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले. दुसरीकडे चंपाई सोरेन यांनी राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Hemant Soren
Maharashtra Politics : कन्फर्म! लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची तारीख ठरली

5 फेब्रुवारीला होणार फ्लोर टेस्ट

आता चंपाई सोरेन यांना 5 फेब्रुवारी रोजी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यासाठी इंडिया आघाडीच्या 36 आमदारांना हैदराबादला हलवण्यात आले असून काही आमदार झारखंडमध्येच थांबले आहेत. अशातच महाआघाडीचे काही आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com