Heeraben Modi Passed Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; हिराबेन मोदी यांचं वृद्धापकाळाने निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे.
PM Narendra Modis Mother Heeraben Modi Passed Away
PM Narendra Modis Mother Heeraben Modi Passed Away ANI

PM Narendra Modi's Mother Heeraben Modi Passed Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या निधनाची माहिती ट्विट करत दिली आहे. बुधवारी हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या ४ दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरू होते. (Latest Marathi News)

PM Narendra Modis Mother Heeraben Modi Passed Away
Pele Passes Away : क्रीडा विश्वावर शोककळा; ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन

आईला भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी (PM Modi) हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. मात्र, आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून आईला श्रद्धांजली वाहिली आहे. आणि आता ते आईला भेटण्यासाठी दिल्लीहून अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.

दरम्यान, हिराबेन यांनी 18 जून रोजीच त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला. तर, पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेटही घेतली होती. मोदींनी आईसोबत बराच वेळ गप्पाही मारल्या, नंतर त्यांनी आईच्या पायाल स्पर्श करत आशीर्वाद घेतले. त्यावेळी मोदी आणि त्यांच्या आईसोबतच्या भेटीचे फोटो समोर आले होते, ज्यामध्ये ते हिराबेनचे आशीर्वाद घेताना दिसले. (PM Narendra Modi Latest News)

मोदींनी जवळपास 46 मिनिटे आईसोबत गप्पा मारल्या होत्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे जुने चित्र त्यांच्या निवासस्थानातील भिंतीवर देखील आहे. हे पाहता पंतप्रधानांचे मातृप्रेम स्पष्ट होते. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी भावूक झाले. आईच्या निधनाची माहिती ट्विट करत त्यांनी दिली.

दरम्यान, भारत कोरोनाच्या काळात जेव्हा लोक लस घ्यायला घाबरत होते. तेव्हा हिराबेन मोदींनी लस घेऊन लोकांसमोर आदर्श निर्माण केला होता. हिराबेनचे हे पाऊल पाहून समाजातील अनेक लोक लस घेण्यासाठी पुढे आले. एवढेच नाही तर त्या मतदान केंद्रावर जाऊन निवडणुकीत मतदानही करताना दिसल्या होत्या.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com