PM Modi : पंतप्रधान मोदी राधा स्वामी सत्संगमध्ये, बाबा गुरिंदर सिंह ढिल्लोंशी १ तास चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधा स्वामी सत्संगमध्ये बाबा गुरिंदर सिंह ढिल्लो यांच्याशी १ तास चर्चा केली.
PM Narendra Modi visits Radha swami Satsang
PM Narendra Modi visits Radha swami Satsang saam tv
Published On

PM Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, शनिवारी सकाळी आदमपूर विमानतळावर पोहोचले. कॅबिनेट मंत्री ब्रह्म शंकर जिमपा, मुख्य सचिव विजय कुमार झांजुआ आणि डीजीपी गौरव यादव यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी येथून शेट अमृतसरच्या राधा स्वामी सत्संगमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी संप्रदायाचे प्रमुख बाबा गुरिंदर सिंह ढिल्लो यांची भेट घेतली. जवळपास एक तास पंतप्रधान मोदी आणि डेरा ब्यास प्रमुखांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने तेथून निघाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी ट्विट केलं होतं. बाबा गुरिंदर सिंह ढिल्लो यांच्या नेतृत्वात आरएसएसबी अनेक सामूहिक सेवेत सर्वात पुढे राहिले आहे, असे त्यांनी नमूद केले होते. दरम्यान, राधा स्वामी सत्संग डेरा बाबा जयमल सिंह यांच्या नावानेही ओळखला जातो. अमृतसरपासून जवळपास ४५ किलोमीटरवर ब्यास शहरात ते आहे. देशभरात विशेषतः पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेशात त्यांचे अनुयायी आहेत.

PM Narendra Modi visits Radha swami Satsang
PM Narendra Modi | मोदींची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा, पाहा मोदी काय म्हणालेत?

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्याला विरोध

पंतप्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्याला विरोध करणाऱ्या किसान मजदूर संघर्ष समितीच्या नेत्यांना आणि संघटनेशी जोडलेल्या अन्य शेतकऱ्यांना पंजाब पोलिसांनी त्यांच्या गावातच रोखले. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या गावातच मोदींच्या दौऱ्याला विरोध दर्शवला. (Breaking Marathi News)

PM Narendra Modi visits Radha swami Satsang
Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक

पंतप्रधानांची हिमाचलमध्ये सभा

हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपचे सरकार आहे. येथील सत्ता राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. कोणत्याही परिस्थितीत येथील सत्ता जाऊ द्यायची नाही.

दुसरीकडे आम आदमी पक्ष या दोन्ही राज्यांत जोर लावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिमाचल प्रदेशात सभा घेत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून हिमाचल प्रदेशात पूर्ण ताकद लावली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com