नवी दिल्ली : आजपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. सर्वांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखावी, असे आवाहन मोदी यांनी केले. सदनाचा सकारात्मक वापर होऊन देशासाठी उपयुक्त काम यातून होईल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केला आहे. तसेच सगळ्यांकडून सहकार्याची आशाही त्यांनी व्यक्त केली.
आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत असल्याने हे अधिवेशन महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. या पावसाळी अधिवेशनात नूतन अध्यक्ष व नूतन उपाध्यक्षांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सभागृहात खुल्या मनाने चर्चा झाली पाहिजे. हे संवादाचे माध्यम आहे. जिथे गरज आहे तिथे वाद व्हायला हवा, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.
संसदेत खुल्या मनाने संवाद व्हायला हवा, गरज पडल्यास चर्चाही व्हायला हवी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मी सर्व खासदारांना विचार करून चर्चा करण्याचे आवाहन करतो. हा काळ खूप महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवाचे हे पर्व आहे. १५ ऑगस्ट आणि येत्या २५ वर्षांचे विशेष महत्त्व आहे. जेव्हा देश स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करेल, तेव्हा आपला प्रवास निश्चित करण्याचा संकल्प करण्याची वेळ येईल, असंही पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Election) एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा आमनेसामने आहेत. भारताचे १५ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी ४,००० हून अधिक सदस्य आज मतदान करणार आहेत. झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना अनेक प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिल्याने, संख्या स्पष्टपणे एनडीएच्या उमेदवाराच्या बाजूने आहे.
शिवसेना, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल (BJD), नितीश कुमार यांचा जनता दल-युनायटेड, शिरोमणी अकाली दल, मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्ष (BSP), अण्णाद्रमुक, टीडीपी, यांचा समावेश आहे. YSRCP आणि चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी या पक्षांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.