PM Modi: सावध रहा, मास्क वापरा! सरत्या वर्षाला निरोप देताना काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? 'मन की बात' मधील 10 महत्वाचे मुद्दे

वर्ष संपायला काही दिवस उरले असतानाच आज (25, डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला.
Narendra Modi
Narendra Modi saam tv
Published On

Narendra Modi: वर्ष संपायला काही दिवस उरले असतानाच आज (25, डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. 'मन की बात' मध्ये त्यांनी वाढत्या कोरोनासह अनेक विषयांवर जनतेला मार्गदर्शन केले.

चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर आता भारतीय सरकार कोणत्या सुचना देणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 'मन की बात'मध्ये देशवासियांशी बोलताना कोरोनाबद्दलही अनेक सुचना केल्या. पाहूया पंतप्रधानांच्या या भाषणातील महत्वाचे मुद्दे.

1. आपल्या भाषणामध्ये सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सरत्या वर्षातील अनेक आठवणी सांगितल्या तसेच अमृत महोत्सवी वर्ष साजरे केल्याने हे वर्ष खास होते असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादनही केले.

२. देशावर पुन्हा कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. याबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना सावध करताना मास्क वापरण्याच्या, सावधगिरी बाळगण्याच्या सुचना दिल्या.

3. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटलबिहारी वाजपेयी यांनाही अभिवादन केले. "माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atalbihari Vajpayee) यांनी शिक्षण, परराष्ट्रसंबंधांसह अनेक क्षेत्रामध्ये देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले," अशा शब्दात त्यांनी वाजपेयींच्या राजकारणाचे कौतुक केले.

Narendra Modi
Tunisha Sharma: वय अवघं वीस वर्ष अन् करोडोंची मालकीण! टुनिशा शर्माने आपल्या मागे सोडली 'इतक्या' कोटींची संपत्ती

4. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "यावर्षी भारताला G-20 गटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही मिळाली आहे. मागच्या वेळीही मी याबद्दल सविस्तर चर्चा केली होती. तसेच2023 मध्ये आपल्याला G-20 चा उत्साह नव्या उंचीवर घेऊन जायचा आहे."

6. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींंनी आयुर्वेदाला आपल्या आयुष्याचा भाग बनवण्याचे आव्हानही केले. यावेळी ते म्हणाले की, "विज्ञानावर आधारित औषधांच्या काळातही योग आणि आयुर्वेद महत्वाचे ठरत आहेत. टाटा मेमोरियल सेंटरच्या संशोधनात स्तनाच्या कर्करोगासाठी आयुर्वेद महत्वाचे ठरत असल्याचेही सिद्ध झाले आहे."

7. "उद्या 26 डिसेंबर हा 'वीर बाल दिवस' आहे आणि त्यानिमित्ताने मला दिल्लीत साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या हौतात्म्याला समर्पित कार्यक्रमात सहभागी होण्याचा बहुमान मिळेल. देश, साहिबजादे आणि माता गुजरी यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील,"असेही ते आपल्या भाषणात म्हणाले.

Narendra Modi
Corona Update: कोरोना येण्याच्या भीतीने नागरिकांना 'लसी'ची आठवण; मात्र या 'लसीं'चा साठा संपला

8. "गेल्या काही वर्षात आपण वैद्यकीय क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे.याच जोरावर आपण पोलिओ आणि चेचक सारख्या रोगांना देशातून हद्दपार केले आहे असे म्हणत आता काला आजारही नष्ट होईल," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

9. सरत्या वर्षाला निरोप देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "हे वर्ष अत्यंत महत्वाचे होते कारण आपण स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले तसेच या वर्षी आपण प्रगत आणि सर्वाधिक वेगाने जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मानही मिळवला."

10. भाषणाच्या शेवटी नववर्षाच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले की ,"आता आपण नववर्षात म्हणजे २०२३ मध्ये भेटू. तुम्हा सर्वांना नवर्षाच्या शुभेच्छा. नववर्षात आपण सर्वांनी नवे संकल्प करुया आणि त्याला पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया, नवर्षात देश आणखी यशाची नवनवीन शिखरे गाठेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com