PM Narendra Modi : PM मोदींसाठी त्याने मंदिर बांधलं; तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी केला नवस

Political News : अरुण वेर्णेकर असं या तरुणाचं नाव असून तो कारवार शहरातील सोनरवाडा येथे राहतो. IANS या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. इतकंच नाही तर या तरुणाने मोदींचे मंदिर देखील बांधले आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSaam Tv

PM Narendra Modi:

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत यावेत यासाठी त्यांचा चेहरा समोर ठेवून भाजपमध्ये प्रचार केला जात आहे. मोदींची लोकप्रियता मोठ्याप्रमाणावर पसरली आहे. मोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान पदी विराजमान व्हावं यासाठी एका तरुणाने थेट आपल्या डाव्या हाताची तर्जनी कापत देवीला अर्पन केली आणि साकडं घातलं आहे.

PM Narendra Modi
PM Modi in Mumbai : २०१४ आधी बँकिंग क्षेत्र डळमळीत होतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी

तरुणाने केलेल्या या प्रकारामुळे सध्या सोशल मीडियावर सर्वत्र त्याची चर्चा सुरू आहे. कर्नाटकमध्ये शनिवारी ही घटना घडलीये. अरुण वेर्णेकर असं या तरुणाचं नाव असून तो कारवार शहरातील सोनरवाडा येथे राहतो. IANS या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

इतकंच नाही तर या तरुणाने मोदींचे मंदिर देखील बांधले आहे. तरुण नियमितपणे या मंदिरात पुजा देखील करतो. हाताचे बोट कापल्यानंतर या तरुणाने आपल्या राहत्या घरात भिंतीवर माँ काली, मोदींचे रक्षण करा असंही लिहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फार महान आहेत. ते तिसऱ्यांदा देखील पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा देखील या तरुणाने व्यक्त केलीये.

IANS वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, प्रसारमाध्यमांशी बोलताना अरुण वेर्णेकर म्हणाले की,चीन आणि पाकिस्तान यांच्यामुळे ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर संपल्या आहेत. या आधी सातत्याने काश्मीरमधून दहशतवादी हल्ले आणि जवानांच्या मृत्यूच्या बातम्या येत होत्या,मात्र आता हे परिसर शांत आहेत. देशाच्या विकासासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे, असे अरुण वेर्णेकर म्हणाले.

PM Narendra Modi
Sushil Kumar Modi: भाजप नेते सुशील कुमार मोदी यांना कॅन्सर, ६ महिन्यांपासून सुरू आहे संघर्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com