Breaking: पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट उघड
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiSaam Tv
Published On

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हत्येचा कट उघड झाला आहे. ईमेलचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) धमकीचे ई-मेल (E-mail) मिळाले आहेत.

हे देखील पहा-

ईमेलमध्ये 20 स्लीपर सेल असल्याचे सांगण्यात आले होते.

या कटाचा पर्दाफाश होऊ नये, म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे ई-मेलरने म्हटले आहे. पंतप्रधान मोदींना मारायला तयार आहेत. त्यांच्याकडे 20 स्लीपर सेल आहेत. एकूण 20 किलो आरडीएक्स आहे.

Prime Minister Narendra Modi
CSKच्या या स्टार खेळाडूची कारकीर्द एक सामना खेळल्यानंतर संपली!

मेल रायटरचे अनेक दहशतवाद्यांशी संबंध!

या मेलनुसार हल्ल्याची योजना तयार करण्यात आली आहे. मेलमध्ये असे म्हटले आहे की, ज्या व्यक्तीने हा मेल लिहिला आहे त्याचे अनेक दहशतवाद्यांशी (terrorists) संबंध आहेत. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनेही गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांना धमकीचे ई-मेल पाठवले आहेत. ज्या मेल आयडीवरून हा मेल आला त्याची चौकशी सुरू आहे. हा ईमेल राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई शाखेकडे आला आहे.

सुरक्षा दलांना दिला अलर्ट

पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट उघड झाल्यानंतर सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com