
न्यूयॉर्कच्या लागार्डिया एअरपोर्टवर दोन विमानांची धडक झाली.
एका विमानाचा पंख दुसऱ्या विमानाच्या पुढील भागाला धडकला.
अपघातात एका फ्लाईट अटेंडंटला किरकोळ दुखापत झाली.
या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा मोठा विमान अपघात झाला. न्यूयॉर्कमधील एका एअरपोर्टवर दोन विमानांची टक्कर झाली. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. या विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, लागार्डिया एअरपोर्टवर बुधवारी सायंकाळी विमानांचा अपघात झाला. एका विमानचा उजवा पंख आणि दुसऱ्या विमानाचा पुढचा भाग यांची जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये एका फ्लाईट अटेंडंटला किरकोळ दुखापत झाली. जखमीला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत झालेल्या संवादामध्ये पायलट असे सांगत होता की, 'त्यांच्या विमानाच्या उजव्या पंखाने आमच्या विमानाच्या पुढच्या बाजूला जोरदार धडक दिली. कॉकपिट, आमची विंडस्क्रीन आणि... आमच्या स्क्रीनचे नुकसान झाले.' याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या घटनेमुळे दोन्ही विमानात असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.
चार्लोट डग्लस इंटरनॅशनल एअरपोर्टवरून येणारे एक विमान लागार्डिया एअरपोर्टवर उतरल्यानंतर ते दुसऱ्या रनवेवर जात होते. त्याचवेळी या विमानाच्या उजव्या पंखाने दुसऱ्या विमानाच्या पुढच्या बाजूला धडक दिली. त्यामुळे दोन्ही विमानांचे नुकसान झाले. नेकमं काय घडलं हे कुणालाच कळाले नाही त्यामुळे प्रवासी घाबरले होते. यापूर्वी मार्चमध्ये लँडिंगदरम्यान लागार्डिया एअरपोर्टवरच एका डेल्टा विमानाचे पंख रनवेला आदळून अपघात झाला होता.
या वर्षी जानेवारीमध्ये, रेगन वॉशिंग्टन नॅशनल एअरपोर्टवर अमेरिकन आर्मी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाची हवेत धडक झाली होती. २९ जानेवारी रोजी झालेल्या या अपघातात ६७ जणांचा मृत्यू झाला होता. ३० जानेवारी रोजी अमेरिकेत आणखी एक विमान अपघात झाला होता. जिथे फिलाडेल्फियामध्ये एअर अॅम्ब्युलन्स कोसळली होती. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला होता.
१० एप्रिल रोजी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे एक हेलिकॉप्टर कोसळले होते. हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर २२ मे रोजी अमेरिकेतील सॅन दिएगो येथे एक लष्करी विमान कोसळले होते यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.