Petrol Diesel Price 6 June: पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर; वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या नवीनतम दर

Petrol Diesel Price News Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती आज घसरताना दिसत आहेत.
Petrol Diesel Prices
Petrol Diesel PricesSaam Tv

Petrol Diesel Rates: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती आज घसरताना दिसत आहेत. WTI क्रूड 0.21 घसरून प्रति बॅरल 71.94 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.17 डॉलरने घसरून प्रति बॅरल 76.54 डॉलरवर विकले जात आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. (Latest Marathi News)

Petrol Diesel Prices
Train Accident Update: ओडिशा ट्रेन अपघाताच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक खुलासा, सीबीआयकडे पुढील तपासाची जबाबदारी

भुवनेश्वरमध्ये आज पेट्रोल (Petrol) 103.63 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर डिझेलचा दर 95.18 रुपये आहे. जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल (Diesel) 93.80 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. गुरुग्राममध्ये पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही मात्र डिझेल थोड्या वाढीसह 89.72 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल १०६.०३ रुपये और डीजल ९२.७६ रुपये प्रति लीटर

Petrol Diesel Prices
Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकरही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत? नेमकं काय घडलंय?

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com