Train News:मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन प्रत्येक सामान्य नागरिक प्रवासासाठी वापरत असतो. अशात ही ट्रेन उशिरा येणे यात काही नवल नाही. मात्र लांबचा पल्ला गाठणाऱ्या ट्रेनला उशिर झाल्यास प्रवाशांचे फार हाल होतात. एक लांब पल्ल्याची ट्रेन तब्बल ९ तास उशीरा आली. मात्र तिला पाहून आयुष्यात मोठं यश मिळवल्याप्रमाणे प्रवाशांना आनंद झाला. सर्व प्रवाशी थेट प्लॅटफॉर्मवरच नाचू लागले. (Latest Marathi News)
सोशल मीडियावर या प्रवाशांचा आणि त्यांच्या अनोख्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ (Video)व्हायरल होत आहे. यात ट्रेनला उशिर होणार असल्याने सर्व प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे आहेत. तब्बाल ९ तास ट्रेन उशिरा येत असल्याने प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी जमा झाली आहे. बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने अनेक तासांपासून काही प्रवाशी इथे उभे आहेत. अशातच अचानक रेल्वे अनाउन्समेंट ऐकू येते आणि सर्वाचे डोळे ट्रेनकडे लागतात.
तितक्यात प्लॅटफॉर्मवर ट्रेन आलेली दिसते. ही ट्रेन (Train) पाहून काही प्रवाशांना इतका आनंद होतो की ते जोरजोरात शिट्ट्या वाजवून नाचू लागतात. व्हिडिओमध्ये काही जण टाळ्या वाजवत आहेत तसेच या प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे. हार्दिक बॉन्थू नावाच्या एका यूजरने त्याच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच याला कॅप्शन देत लिहिले आहे की, ९ तासांच्या प्रतिक्षेनंतर ट्रेन आली आणि आम्ही असे व्यक्त झालो.
हा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे. युजर्सने यावर कमेंट्सचा नुसता वर्षाव केला आहे. काहींनी नाचणाऱ्या प्रवाशांमध्ये आम्ही स्वत:ला पाहीलं असं म्हटलं आहे. ट्रेनला उशीर झल्यावर होणारं दु:ख एक रेल्वे प्रवाशीच समजू शकतो असं म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.