जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला, बचावकार्य सुरु

जम्मू- श्रीनगर महामार्गावर एका बोगद्याचे काम सुरू
Jammu Kashmir Tunnel Collapsed
Jammu Kashmir Tunnel CollapsedSaamTv

श्रीनगर: गेल्या काही दिवसांपासून जम्मू- श्रीनगर महामार्गावर (Jammu Srinagar National Highway) एका बोगद्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या ठिकाणी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या बोगद्याचे काम सुरू असताना या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. मेकरकोट परिसरात खूनी नाला येथे बोगद्याचा काही भाग कोसळला (Collapsed) आहे. तर ६ ते ७ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार की, बचाव मोहिमेच्या दरम्यान २ जणांची सुटका करण्यात आली असून ६ ते ७ जण अजूनही बोगद्यात अडकले आहेत.

हे देखील पाहा-

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार की, बोगद्यात (tunnel) अडकलेले लोक बोगद्याचे ऑडिट करणाऱ्या कंपनीचे (company) कर्मचारी आहेत. बनिहालहून घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.बांधकामाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली. त्यावेळेस बोगद्यासमोर बुलडोझर आणि ट्रकबरोबरच अनेक मशिन आणि वाहने उभी होती. बोगदा कोसळल्यामुळे त्यांचेही पूर्ण नुकसान झाले आहे.

Jammu Kashmir Tunnel Collapsed
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे- पालकमंत्री

रामबनचे उपायुक्त मसरतुल इस्लाम आणि एसएसपी मोहिता शर्मा बोगद्यात सुरू असलेल्या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, या दुर्घटनेविषयी रामबन येथील उपायुक्तांनी माहिती दिली आहे. यामध्ये काही जण अडकल्याची शक्यता असून बचावकार्य सुरू असल्याचे सांगितले जात आहे. बोगद्याच्या ऑडिटचे काम सुरू असताना हा भाग कोसळल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये अडकलेले लोक ऑडिटचे काम करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी असल्याचे समजत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com