Pakistan News: पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर, इमरान खान पुन्हा सत्तेत येणार?

Pakistan Election News: पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर, इमरान खान पुन्हा सत्तेत येणार?
 Shahbaz khan Vs Imran khan
Shahbaz khan Vs Imran khanSaam Tv
Published On

Pakistan Election News:

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. पुढील वर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात येथे निवडणूक होणार आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाने गुरुवारी याबाबत माहिती दिली.

निवडणूक आयोगाच्या निवेदनानुसार, ५४ दिवसांच्या निवडणूक कार्यक्रमानंतर २०२४ मध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका होणार आहेत. ९ ऑगस्ट रोजी पाकिस्तानची संसद बरखास्त करण्यात आली होती. तेव्हापासून काळजीवाहू पंतप्रधान येथे जबाबदारी सांभाळत आहेत.

 Shahbaz khan Vs Imran khan
Up Crime News: दारुच्या नशेत मित्राकडून मैत्रिणीची गोळ्या झाडून हत्या, नेमकं काय घडलं?

संसद बरखास्त केल्यानंतर पाकिस्तानमध्ये ९० दिवसांत निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, ताज्या जनगणनेनंतर नवे परिसीमन केले जाईल. यासाठी वेळ लागेल.  (Latest Marathi News)

यामध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान तुरुंगात असताना निवडणुकीची घोषणा झाली आहे. याशिवाय त्यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाविरुद्धही मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

 Shahbaz khan Vs Imran khan
Ahmednagar Crime News: तिहेरी हत्याकांड! जावयाने केली पत्नीसह मेव्हणा आणि आजे सासूची हत्या; काय आहे कारण?

पाकिस्तानी राज्यघटनेनुसार, पाकिस्तान हा धर्मनिरपेक्ष नसून इस्लामिक देश आहे. त्यामुळे इस्लामचा अनुयायीच तेथे पंतप्रधान होऊ शकतो. पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार तेथील संसदेला मजलिस-ए-शुरा म्हणतात. येथील खालच्या सभागृहाला म्हणजे नॅशनल असेंब्ली आणि वरच्या सभागृहाला आयवान-ए बाला म्हणतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com